Type Here to Get Search Results !

राहुरी - दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादावरून तरुणावर चाकूने वार करत फायटर व लाथा बूक्क्यांनी मारहाण.

 दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादावरून तरुणावर चाकूने वार करत फायटर व लाथा बूक्क्यांनी मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


दोन महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरुन चार जणांनी मिळुन अनिकेत काळे या तरुणावर चाकूने वार करून फायटर व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहर हद्दीत दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी घडलीय. 


अनिकेत भाउसाहेब काळे, वय २२ वर्षे, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी. या तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, अनिकेत काळे याचे राहुरी येथे राहणारा भैय्या गायकवाड याचे सोबत सुमारे दोन महीन्यापुर्वी किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. तेव्हा ते वाद मिटले होते.


दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ८ वाजे च्या सुमारास अनिकेत काळे व त्याचे मीत्र आकाश राजेंद्र तनपुरे, अमीत सोपान कटारे, रा. राहुरी हे राहुरी शहरातील पाण्याच्या टाकीजवळ रोडवर उभे होते. तेव्हा तेथे आरोपी मोटरसायकलवर आले व अनिकेत याला म्हणाले कि, तु येथे काय करतो, तुझे येथे काय काम आहे.


 तेव्हा अनिकेत त्यांना म्हणाला की, मला मित्रांकडुन पैसे घ्यायचे आहेत, त्यामुळे येथे थांबलो आहे. तेव्हा आरोपी म्हणाले, तु येथे थांबु नको, असे म्हणुन आरोपींनी अनिकेत काळे याला शिवीगाळ केली. तसेच चाकू सारख्या हत्याराने वार करुन फायटर व लाथाबुक्याने मारहान केली. तसेच पुन्हा आमचे नादी लागला तर तुला जिवे ठार मारुन टाकु, अशी धमकी दिली. 


घटनेनंतर अनिकेत भाउसाहेब काळे याने राहुरी पोलिस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी भैय्या गायकवाड, तुषार गायकवाड, अनिकेत पवार, ईश्वर शेळके (पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. राहुरी बु. ता. राहुरी. या चार जणांवर गून्हा रजि. नं. १२१०/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आलाय.