मध्यरात्री दरम्यान घरात झोपलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
मध्यरात्रीच्या दरम्यान घरात झोपलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी राहुरी तालूक्यातील चिंचाळे परिसरात घडलीय. या घटने बाबत पोलिस ठाण्यात संतोष बर्डे याच्यावर अपहरण चा गून्हा दाखल करण्यात आलाय.
१५ वर्षे ११ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तीच्या आई वडीलांसह राहुरी तालूक्यातील चिंचाळे परिसरात राहते. सदर दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी घरात झोपली होती. दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे २ वाजेच्या दरम्यान पिडीत मुलीच्या वडिलांना जाग आली. तेव्हा त्यांची अल्पवयीन मुलगी घरातून गायब झाल्याचे दिसून आले.
त्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचा परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळुन आली नाही. पिडीत मुलीला संतोष विठ्ठल बर्डे याने फुस लावुन पळवुन नेले अशी मुलीच्या नातेवाईकांची खात्री झाली.
पिडीत मुलीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संतोष विठ्ठल बर्डे, रा. धामोरी, ता. राहुरी. याच्यावर गून्हा रजि. नं. १२०९/२०२३ भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरण चा गून्हा दाखल करण्यात आलाय.
