जाण्या येण्याच्या रस्त्याच्या कारणावरुन भाऊ व भावजयला काठीने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
जाण्या येण्याच्या रस्त्याच्या कारणावरुन भावाने भावाला मारहाण तसेच भावजयला शिवीगाळ केल्याची घटना राहुरी तालूक्यातील कनगर येथे दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी घडलीय. या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आलाय.
दिलावर बंडुभाई शेख वय ५५ वर्षे हे राहुरी तालूक्यातील कनगर येथे राहत असून त्यांचा भाऊ मन्सुर बंडुभाई शेख हा त्यांच्या घराचे पाठीमागे त्याचे कुटुंबास राहण्यास असुन तो नेहमी रस्त्याचे येणे जाण्याचे कारणावरुन वाद घालीत असतो.
दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ८.३० वाजे दरम्यान दिलावर शेख व त्यांची पत्नी हमिदा शेख असे त्यांच्या घरात असताना तेथे त्यांचा भाऊ मन्सुर बंडुभाई शेख व इतर आरोपी आले. आणि दिलावर शेख यांना घराचे बाहेर ये असे म्हणुन शिवीगाळ करु लागले.
यावेळी दिलावर शेख व त्यांची पत्नी घराचे बाहेर येवुन त्यास म्हणालो की, तु विनाकारण शिवीगाळ का करतो. असे म्हणाले असता आरोपी दिलावर शेख यांना म्हणाले कि तु खुप माजला का? थांब तुझा माझ जिरवतो. असे म्हणुन काठीने मारहान केली. यावेळी दिलावर शेख यांची पत्नी भांडण सोठवीण्यासाठी आल्या असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच पुन्हा तुम्ही माझे नादी लागला तर मी एक एकाला जिवे ठार मारुन टाकीन, अशी जिवे मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर दिलावर बंडुभाई शेख यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी मन्सुर बंडुभाई शेख, साजीद मन्सुर शेख, मोबीन मन्सुर शेख, अरमान आयाज पठाण, सर्व रा. कनगर, ता. राहुरी. यांच्यावर गून्हा रजि. नं. १२०१ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आलाय.
