मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने जनतेचा अंत पाहू नये - सुजित झावरे पाटील
टाकळी ढोकेश्वर
मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर सरकारची भूमिका आतून एक व बाहेरून एक अशा प्रकारची असून कुठल्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय न घेता सरकारने वेळकाढूपणा करत मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचे काम चालवले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने जनतेचा अंत पाहू नये
सदर आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी जि.प.मा.उपाध्यक्ष सुजित झावरे पा.यांनी केली आहे.
राज्यभरातील सकल मराठा शांत दिसत असला तरी सदर आरक्षण मुद्द्यांची धग अतिशय खोलवर पोहोचली आहे. आरक्षण प्रश्नाबाबत शासनाने वेळकाढूपणाचे धोरण बाजूला ठेवत राज्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या मराठा समाजाच्या जिव्हाळ्याच्या आरक्षण प्रश्नाबाबत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. मराठा समाजाने आतापर्यंत जे काही मोर्चे,आंदोलने केली ती शांततेच्या मार्गाने कुठलेही गालबोट न लावता पार पाडली परंतु आता मराठा समाजाच्या सहनशीलतेलाही मर्यादा आहे...सरकारी नोकरी किंवा शिक्षणव्यवस्था यामध्ये मराठा समाजाचा तरुण आजही उपेक्षित आहे..अस होत असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांसाठी काहीतरी गाजर किंवा आमिष दाखवून मराठा समाजाचा वापर करुन घ्यायचा आणि एरवी समाजाला झुलत ठेवण्याचे काम शासनाने आतापर्यंत केले असून यापुढच्या काळात शासनाने तसा कुठला प्रयत्न करुन मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये तसेच मर्यादेचे उल्लंघन करु नये..मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर तातडीने निर्णय घेत सरकारने समाजाला दिलासा द्यावा अन्यथा येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकांच्या तीव्र भावनेचा उद्रेक सरकारला सहन करावा लागेल. लागते. इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या समाजाला विरोध न करता मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वसमावेशक कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळावे ही सकल मराठा समाजाची भावना आहे.मराठा समाजाला केवळ नैसर्गिक हक्काने मिळणारे आरक्षण सरकारने तातडीने द्यावे.मराठा आरक्षण प्रश्नावर अभ्यास करून समिती नेमण्यात येईल,कायदेशीर लढाई लढू असे खोटी आश्वासने देऊन सरकार राज्यातील जनतेला वेड्यात काढण्याचे काम करत आहे मराठा समाजातील काही लोक उपोषणला बसले म्हणून केवळ त्यांना पाठिंबा देण्यापेक्षा या प्रश्नावर व्यापक लढा उभारण्यासाठी भूमिका घेण्याची गरज आहे. या निमित्ताने शासनाला राज्यकर्त्यांना विनंती आहे आरक्षण प्रश्नावर तातडीने आम्हाला न्याय द्यावा. एकतर सरसकट राज्यातील सर्व समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा सर्व समाजाचे आरक्षण काढून घ्यावे अशा प्रकारची ठोस भूमिका शासनाने घ्यावी.संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ठिकठिकाणी मराठा आरक्षणावर चालू असलेल्या आंदोलन भूमिकेला पारनेर नगर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने पाठींबा देऊन वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून सरकारला जागे करण्याची भूमिका यावेळी सुजित झावरे यांनी मांडली.
