रेशनकार्ड संदर्भातील अडचणी दुर होणे बाबत मनसे च्या वतीने महसूल प्रशासनाला निवेदन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील दवणगाव येथील ४१ कुटुंबाच्या रेशनकार्ड संदर्भात अनेक तक्रारी असल्याने त्या कुटुंबांना शासकीय योजनां पासून वंचित रहावे लागत आहे. या प्रकाराची दखल घेत रेशनकार्ड संदर्भातील अडचणी दुर होणे बाबत आज दिनांक ३० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महसूल प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राहुरी तालूक्यातील दवणगाव येथील ४१ कुटुंबाना महसूल प्रशासनाकडून रेशन कार्ड मीळाले आहेत. त्यांना ऑनलाईन नंबर मीळाला आहे.
मात्र रेशनकार्ड ऑनलाईन दिसत नसल्याने त्यांना रेशनकार्डवर धान्य मिळत नाही. तसेच आयुष्यमान भारत योजनेतून ५ लाभ रुपये रक्कमेचा दवाखान्याचे उपचारांचा लाभ मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ रेशनकार्ड धारकांवर आली आहे.
संबंधीत सर्व प्रकारच्या कागद पत्रांची पूर्तता करून सुद्धा लाभ मिळण्या पासून वंचित राहावे लागले होते. व त्यामुळें आयुष्यमान भारत योजनेचा लाभ भेटणार नाही. म्हणून दि. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वरील सर्व लाभार्थ्यांना न्याय मिळावा. यासाठी राहुरीच्या निवासी तहसीलदार यांना तालूकाध्यक्ष मनोज जाधव यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष सहकार सेनेचे ज्ञानेश्वर गाडे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव उंडे, तालुका उपाध्यक्ष सुनील खपके, शिवाजीनगर शहराध्यक्ष विजय पेरणे, बापू साळुंके, सुरेश होन, सुभाष होन, किशोर खपके, आप्पासाहेब मोहटे, किरण बटवाल, आदी मनसे सैनिक उपस्थित होते.
