जरांगे यांच्या सभेसाठी नेवासा शहरातील पार्किंग व्यवस्था... व वाहतूक मार्गात बदल.....
नेवासा : मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीकरीता आंदोलन करणारे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन सकल मराठा समाज यांचे वतीने नेवासा खुर्द,ता.नेवासा येथे गुरुवार दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वा.करण्यात आलेले आहे. सदर सभेचे ठिकाण नेवासा शहरातील मध्यवर्ती भागात नेवासा फाटा ते श्रीरामपूर या मार्गालगत आहे.श्री मनोज जरांगे पाटील यांचे सभेकरीता येणारे नागरीकांची व वाहनांची गर्दी मोठया प्रमाणात होणार असुन नेवासा फाटा ते श्रीरामपुर या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे,तसेच सदर मार्गावरील वाहनांचा सभेकरीता येणारे नागरीकांना धक्का लागून, अपघात होवून कायदा व सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे सभेकरीता येणारे नागरीकांचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नेवासा फाटा ते श्रीरामपुर मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वलविली आहे.
वाहतूक मार्गात बदल
गुरुवार सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत
नेवासा फाटा ते श्रीरामपुर कडे जाणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग
नेवासा फाटा ,प्रवरासंगम,सिध्देश्वर मंदिर, वाशिम टोका, गोधेगाव ,भालगांव ,नेवासा बु,टाकळीभानमार्ग - श्रीरामपुर
श्रीरामपुर - टाकळीभान नेवासा बु, भालगाव ,गोधेगाव, वाशिम टोका, सिध्देश्वर मंदिर, प्रवरासंगम ,नेवासा फाटा
नेवासा फाटा ते श्रीरामपुर या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
अशी असणार पार्किंग व्यवस्था....
श्रीरामपुर रस्त्यावरील वाहने : नेवासा बुद्रुक येथील रामलीला मंगल कार्यालयाच्या प्रांगण व परिसर,मराठी शाळा व विश्वेश्वर नाथबाबा विद्यालय
राहुरी रस्त्या कडून येणारी वाहने : ईदगाह मैदान,उस्थळरोड व खंडोबा मंदिरासमोरील प्रांगण
नेवासा फाटा कडून येणारी वाहने : इज्तेमा मैदान, राधाकृष्ण मंगल कार्यालय परिसर तर
खडका फाट्यावरुन येणारी वाहने : कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगण
