५० लाख रु. मुद्दल व व्याज वसुल करण्यासाठी सावकारां कडून अपहरण करून मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
व्याजाची मुद्दल ५० लाख रु. व त्याचे व्याज वसुल करण्यासाठी हैद्राबाद येथील सावकारांनी राहुरी येथील इसमाला उचलून नेले. आणि मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालूक्यातील गुहा येथे ८ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली होती.
निसार हसन पठाण, वय ४० वर्षे, हे राहुरी तालूक्यातील गुहा पाट येथे राहत असून ते प्लॉटीगचा व्यवसाय करतात. या दरम्यान त्यांची आरोपीं बरोबर ओळख झाली. त्यानंतर आरोपी फयजान चिस्ती यास शिर्डी येथे प्लाट घ्यायचा असल्याने मी त्यास शिर्डी येथे प्लाट दाखवला असता काही कारणामुळे त्यांनी प्लाट घेतला नाही. त्यानंतर निसार पठाण यांनी सुमारे तीन वर्षापूर्वी फयजान अहमद चिस्ती यांचे कडुन ५० लाख रुपये ३ टक्के व्याजाने घेतले होते.
त्यानंतर निसार पठाण यांनी वेळोवेळी फयजान चिस्ती यांना मुद्दल व व्याज देवुन आता पर्यत ४५ लाख रुपये दिले. दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वा. चे सुमारास निसार पठाण हे त्यांच्या घरी असताना आरोपी आले व त्यांनी निसार पठाण यांना शिवीगाळ करुन मला बळजबरीने त्यांचे गाडीत बसवले. तेव्हा निसार पठाण यांची आई व पत्नी त्यांना सोडवीण्यासाठी आले.
तेव्हा आरोपी म्हणाले कि, तुमच्या मुलाने आम्हाला खूप त्रास दिला. तो जोपर्यंत आमचे पैसे देत नाही. तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाहीत. नंतर आरोपी निसार पठाण यांना शिर्डी येथे घेवुन जात असताना त्यांना राहाता ते शिर्डी रोडचे मध्ये गाडी थांबवुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर निसार पठाण यांना शिर्डी येथील रेडडी नावाचे हॉटेलचे बाहेर एका कॅन्टीनमध्ये मला चहा पाजुन आम्हाला आमचे पैसे परत दे, नाहीतर आम्ही तुला खोट्या केस मध्ये गुंतवुण टाकु. अशी धमकी दिली.
त्यानंतर निसार पठाण यांनी आरोपींचे हातपाय जोडुन विनंती करुन त्यांचे तावडीतुन सुटका करुन घेतली. तेव्हापासून आरोपी निसार पठाण याला फोन करुन तु जर आमचे पैसे दिले नाहीतर आम्ही तुला संपवुन टाकु, अशी धमकी देतात. आरोपींच्या त्रासाला कंटाळून निसार हसन पठाण, वय ४० वर्षे, रा. कोळसे वस्ती, गुहा पाट, गुहा, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी फयजान अहमद चिस्ती, रा. प्रधान नामपल्ली, हैद्राबाद व माजीद सोहेलभाई मैसुरी, रा. इराकुंडा रोड पेट्रोल पंप, आर आर जिल्हा, हैद्राबाद यांच्या विरोधात गुन्हा रजि. नं. १२९०/२०२३ भादंवि कलम ३६३, ३२३, ५०४, ५०६, ५०७ प्रमाणे अपहरण, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आलाय.
