मोटरसायकल घेऊन गेलेला तरुण लवकर परत आला नाही म्हणून डोक्यात विट मारुन जखमी केले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
मोटरसायकल घेऊन गेलेला तरुण लवकर घरी परत आला नाही म्हणून दोघां जणांनी मिळून त्या तरुणाच्या डोक्यात विट मारुन जखमी केल्याची घटना राहुरी तालूक्यातील महाडूक सेंटर येथे घडलीय. या घटने बाबत दोघांवर गून्हा दाखल करण्यात आलाय.
छाया अर्जुन थोरात, वय ४५ वर्षे, या राहुरी तालुक्यातील महाडुक सेंटर येथे राहतात. छाया थोरात यांच्या शेजारी त्यांची बहिन इंदुबाई पोपळघट या कुंटुंबासह राहण्यास आहे. दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी छाया थोरात यांचा मुलगा संदिप अर्जुन थोरात व सुन आरती हे श्रीरामपुर येथे जाण्या करीता छाया थोरात यांच्या बहिणीचा मुलगा अमोल रखमाजी पोपळघट याची मोटारसायकल घेवुन गेले होते.
अर्जुन थोरात व त्याची पत्नी आरती हे सायंकाळी घरी आले. तेव्हा अमोल पोपळघट तेथे आला व अर्जुन याला म्हणाला की, तु लवकर घरी का नाही आला. मला माझी गाडीची आवश्यकता होती. आता तु माझे गाडीचे सर्व पैसे दे व गाडी तुलाच ठेव.
तेव्हा अर्जुन थोरात त्यास म्हणाला की, मला दवाखाण्यामध्ये उशीर झाल्याने मला घरी येण्यास उशीर झाला. असे म्हणाल्याचा राग आल्याने अमोल पोपळघट याने अर्जुन थोरात याला घाण घाण शिवीगाळ करु लागला. त्यानंतर त्याने त्याचा मित्र गोविद हांडे यास बोलावुन घेतले.
यावेळी दोन्ही आरोपींनी अर्जुन थोरात याच्या डोक्यात विट मारुन जखमी केले. यावेळी छाया थोरात यांनी सोडवा सोडव केल्याने त्यांना शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर छाया अर्जुन थोरात यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल रखमाजी पोपळघट, रा. महाडुक सेंटर, राहुरी तसेच गोविंद हांडे, रा. हनुमानवाडी, राहुरी यांच्या विरुध्द गून्हा रजि. नं. १२८८/२०२३ भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आलाय.
