Type Here to Get Search Results !

राहुरी - प्रसाद शुगरची पहिली उचल रु. २७००/- प्रमाणे बँकेत वर्ग.

 प्रसाद शुगरची पहिली उचल रु. २७००/- प्रमाणे बँकेत वर्ग.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


प्रसाद शुगर ॲण्ड अलाईड ॲग्रो प्रॉडक्टस् लि. वांबोरी, ता. राहुरी. कारखान्याने या वर्षी गळीतास आलेल्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील ऊसासाठी जाहिर केल्या प्रमाणे विनाकपात पहिली उचल रक्कम रु. २७००/- प्रमाणे पहिला पंधरवाडा पेमेंट वेळेत बँकेत वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक मा. खा. प्रसाद तनपुरे, अध्यक्ष मा. राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे व कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांनी दिली आहे.


यावर्षी गळीतास ऊस पुरविणाऱ्या सर्व ऊस उत्पादकांना इतर कारखाने जो अंतिम दर देतील. त्याप्रमाणे अंतीम ऊस दर देण्याचे जाहीर केलेले असुन त्याचे काटेकोर पालन करणार असल्याची हमी कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे.


या गळीत हंगामा मधील पहिल्या पंधरवाड्याचे पेमंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. तसेच ऊस उत्पादकांनी ऊस दिल्यापासुन पंधरा दिवसांच्या आत पेमेंट उत्पादकांच्या खात्यांवर वर्ग करण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन प्रसाद शुगर कडे ऊस उत्पादकांचा ऊस देण्याचा ओढा वाढत आहे. 


कारखाना व्यवस्थापनाने चालु गळीत हंगामात ५.५० लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उदिदष्ट ठेवण्यात आलेले आहे. सध्या कारखान्यास ऊसाचा चांगला पुरवठा चालु असुन असाच पुरवठा पुढेही चालु ठेवण्याचे अवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्याचा प्रसाद शुगर ने नेहमीच प्रयत्न केलेला आहे. व ऊस उत्पादकांनी प्रसाद शुगरवर जो विश्वास ठेवुन ऊस गाळपास दिला. त्या विश्वासास पात्र राहुन प्रसाद शुगरने ऊस उत्पादकांना स्पर्धात्मक दर देवुन ऊस उत्पादकांचा विश्वास सार्थ ठरविला आहे. 


भविष्यात स्पर्धेच्या युगात स्पर्धात्मक ऊस दर देण्यासाठी कारखाना व्यवस्थापन कटिबध्द आहे. तसेच कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस उत्पादकांनी चुकिच्या व खोट्या भुलथापांना व इतरांचे तात्पुरत्या अमिषाला बळी न पडता विश्वासाने या वर्षी व पुढेही प्रसाद शुगरला जास्तित जास्त ऊस पुरवठा करुन जादा भावाचा, पारदर्शी व्यावहाराचा व विश्वासाचा फायदा घ्यावा असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे.