Type Here to Get Search Results !

राहुरी - गंगाधर सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाकडून अनोखा उपक्रम.

 गंगाधर सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाकडून अनोखा उपक्रम.



गोर, गरीब, निराधार व रस्त्यावर फिरणारे भिक्षुक यांना दिपावलीचे फराळ वाटप करून शुभेच्छा.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.



धन दांडग्यांचा पाहूनचार कोणीही करतात. मात्र गोर, गरीब, निराधार व रस्त्यावर फिरणारे भिक्षुक यांचा पाहूनचार करुन त्यांना दिपावलीचे फराळ वाटप करत शुभेच्छा देणे. ही कल्पनाच वेगळी आहे. असाच एक उपक्रम शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राहुरी शहरात राबवीण्यात आला. आणि या उपक्रमाची तालूक्यात चर्चा सुरु झाली. 


शिवसेना राहुरी शहर प्रमुख गंगाधर सांगळे यांच्या नेतृत्वाखाली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दीपावली सणाच्या निमित्ताने गोरगरीब जनतेची दिवाळी सण गोड व्हावी. म्हणून राहुरी शहर शिवसेनेच्या वतीने आणि युवा सेना शिवसेना महिला आघाडी व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुरी शहरातील भिक्षुक व गोरगरीब जनता यांना दीपावलीचे मिठाई वाटप करण्यात आले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना राहुरी शहर उपप्रमुख बाळासाहेब पवार, जाधव सर, विकास काशीद, दुर्गेश वाघ, अजिज इनामदार, गोरख सिन्नरकर, संतोष सरोदे, युवा सेना राहुरी शहर प्रमुख अशितोष शिंदे, वैभव भागवत, पांडुरंग पठारे, राहुल आव्हाड व शिवसेना महिला आघाडी कार्यकर्ते गुंजाळ मॅडम व त्यांचे काही कार्यकर्ते,


त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते भैयासाहेब शेळके, ॲड. भाऊसाहेब पवार, आणि परखड नेतृत्व असलेले युवा नेतृत्व विक्रम गाडे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून गोरगरिबाची दिवाळी साजरी करण्यास सहभाग घेतला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.