Type Here to Get Search Results !

राहुरी - उपसरपंचपदी पांडूरंग म्हसे यांची एकमताने बिनविरोध निवड.

 उपसरपंचपदी पांडूरंग म्हसे यांची एकमताने बिनविरोध निवड.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील अगण्य समजल्या जाणाऱ्या शिलेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पांडूरंग म्हसे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शिलेगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात नवनिर्वाचित सरपंच बेबीताई बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय आधिकारी अनारसे, व्ही. एस. शिंदे व मंडलाधिकारी विश्‍वास आढाव यांनी हि निवड जाहिर केली. 


निवडीसाठी पांडूरंग म्हसे यांंचा अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले. यावेळी सदस्य मीनाताई देवरे, रत्नमाला उंडे, राहुल बर्डे, मुक्ताबाई तागड, सविता म्हसे, सुभाष भांड, पत्रकार राजेंद्र  म्हसे, आशा तागड, तलाठी वर्षा कातोरे, ग्रामसेविका वनिता कोहकडे, सुनील भांड आदी उपस्थित होते. 


शिलेगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत सदस्यपदाच्या ७ जागा बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना यश आले. उर्वरित सरपंच पदासह सदस्य पदाच्या दोन जागांसाठी निवडणूक लागली. या निवडणूकीत सरपंच पदासाठी बेबीताई बर्डे व सदस्य पदासाठी मिनाताई देवरे, आशाताई तागड विजयी झाल्या. 


यावेळी शिवाजीराव बंगाळ, बाळासाहेब देवरे, प्रभाकर म्हसे, सुरेशराव म्हसे, नितीन म्हसे, प्रा. गंगाधर म्हसे, विजय माळवदे, प्रकाश म्हसे, अनिल म्हसे, कुंडलिक खिलारी, गोडाजी भांड, बाळासाहेब म्हसे, संतोष देवरे, संदिप उंडे, बाळासाहेब रामदास म्हसे, अशोक देवरे, संजय देवरे, रामचंद्र भांड, बापू भांड, विठाताई तागड, रविंद्र म्हसे, दादासाहेब म्हसे, संजय म्हसे, लक्ष्मण म्हसे, सुभाष टेलर, किसन भांड, सागर म्हसे, ज्ञानदेव म्हसे, ज्ञानदेव भांड, राजू ढोकणे, गोरक्षनाथ उंडे, दत्तू भांड, रामदास बर्डे, विठ्ठल शिंदे, पांडूरंग तागड, परसराम कोळसे, भाऊसाहेब तागड, बापूसाहेब म्हसे, मधुकर म्हसे, विजय म्हसे, दिपक म्हसे, चंद्रकांत रेबडे, चांगदेव म्हसे, सुनील डोंगरे, नानासाहेब कोळसे आदी उपस्थित होते.