Type Here to Get Search Results !

राहुरी - आरपीआय कडून विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ.कार्यकर्त्यांनी विकावु नाही तर टिकावु असावे -विलास साळवे.

 आरपीआय कडून विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ.



कार्यकर्त्यांनी विकावु नाही तर टिकावु असावे -विलास साळवे.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालूक्यातील २१ ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभाचे आयोजन राहुरी येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले होते. 


या सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी आरपीआय आठवले गटाचे राहुरी तालूकाध्यक्ष विलास साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी रहावे. तसेच चळवळी सोबत एकनिष्ठ राहिले पाहिजे. पक्ष गट वेगवेगळे असले तरी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्रित राहीले पाहिजे. विकावु न होता टिकावु असले पाहिजे.


नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तालूक्यातील बारागाव नांदुर ग्रामपंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सलीमभाई शेख यांनी विजयी होऊन घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल आंबेडकर चळवळीतील सुनिल चांदणे, सरपंच तुषार दिवे तसेच इतर कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सदस्य सलीमभाई शेख व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. 


यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विवेक सगळगिळे, सागर साळवे, राजेश बागुल, मयुर सुर्यवंशी, अतुल त्रिभुवन, अप्पासाहेब मकासरे, पोपट पवार, अजय जाधव, रियाज देशमुख, कैलास पवार, बाळासाहेब जाधव, अनुसगम शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.