नगरपरीषदच्या उत्पन्नातून दिव्यांगाना ५ % निधी वाटप.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी नगरपरीषदे कडून दिव्यांगाचा दिवाळी सणानिमित्त ५% निधी वाटप करण्यात आला. आठ दिवसापुर्वी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या मागणी नुसार राहुरी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिव्यांगाच्या खात्यात ५% निधी जमा केला. दिव्यांगाच्या टक्केवारी नुसार तीन टप्यात निधी वर्ग करण्यात आला.
राहुरी शहरातील दिव्यांग बांधवांना दिवाळीच्या सणा निमित्त निधी भेटल्याने दिव्यांगाची दिवाळी गोड झाली. त्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. राहुरी नगरपालिकेने २०१६ पासून दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे व माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात राहुरी नगरपालिकेच्या उत्पनातून दिव्यांगाचा ५% निधी दरवर्षी वाटप केला जातो.
दीपावली हा सण हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो. या सणा निमित्त दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत व्हावी. या उद्देशाने दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घाडगे, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश लबडे, शहराध्यक्ष जुबेर मुसली यांच्या मागणीनुसार दिव्यांगाचा ५% निधी वाटप करण्यात आला.
यावेळी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे खजिनदार सलीमभाई शेख, राहुरी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या सचिव छाया हारदे, दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव शिंदे, तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी, कार्याध्यक्ष संजय देवरे, महिला शहराध्यक्ष अनामिका हरेल यांनी आमदार प्राजक्त तनपुरे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ठोंबरे, ग्रंथपाल आप्पासाहेब तनपुरे यांचे आभार मानले.
