माधुरी उदावंत यांची मानव विकास जनकल्याण संस्था, महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्ष पदी निवड.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी येथील माधुरी सुरेश उदावंत यांची मानव विकास जनकल्याण संस्था, महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्ष पदी नूकतीच निवड झाली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत निवड समितीकडून माधुरी उदावंत यांची निवड करण्यात आली.
माधुरी उदावंत या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असुन त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली. असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, संस्थापाक सचिव रविदास बाविस्कर व संस्थापक खजिनदार रजनी बेळणेकर यांनी सांगितले.
सामाजिक कार्यात काम करत असताना माधुरी उदावंत यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र निर्भीडपणे प्रत्येक अडचणीवर मात करत त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपले सामाजिक कार्य सुरु ठेवले आहे. आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
माधुरी उदावंत यांची मानव विकास जनकल्याण संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष पदी निवड करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, संस्थापक सचिव रविदास बाविस्कर व संस्थापक खजिनदार रजनी बेळणेकर यांनी सांगितले.
निवड समीतीने माझ्या कार्याची दखल घेऊन तसेच माझ्यावर विश्वास ठेऊन माझ्यावर फार मोठी जबाबदारी सोपवली आहे. मी माझ्या पदाचा दुरुपयोग न करता फक्त समाज हितासाठी पदाचा वापर करीन. निवड समीतीने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास मी कधीही तडा जाऊ देणार नाही. असे मत माधुरी सुरेश उदावंत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
माधुरी उदावंत यांच्या निवडी बाबत सुवर्णकार समाजाचे संस्थापक अध्यक्ष मधुकर मैड, गोविंद दादा अंबिलवादे, सचिन देशमुख, अमोल भोसले, संतोष पाटील, सुरेखा बागडे आदिंसह परिसरातील सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून माधुरी उदावंत यांचे अभिनंदन होत आहे.
