बळीराजा अभिवादन कार्यक्रम संपन्न.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी येथील संघ मित्रा शाळेत बळीराजा अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जेष्ठ विचारवंत सत्येंद्र तेलतुंबडे यांच्या हस्ते बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरीष गायकवाड होते.
या वेळी आपले विचार मांडताना सत्येंद्र तेलतुंबडे सर यांनी सांगितले की बळीराजा हा प्राचिन भारतातील एक अत्यंत सद्गुणी प्रजाहितदक्ष व सामर्थ्यशाली असा राजा होता आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ समय कृतीने विभागून देणारा असा संविभागि राजा होता.
या वेळी मुख्याध्यापक अरुण तुपविहीरे सर प्राध्यापक पोटे सर अप्पासाहेब मकासरे डॉ प्रवीण क्षिरसागर अशोक पवार बार्टी चे समता दुत एजाज पिरजादे संदिप कोकाटे प्रविण जाधव मधुकर विधाटे बबनराव ओहोळ सर जगधने आदी उपस्थित होते. आभार अप्पासाहेब मकासरे यांनी माणले.
