तरुणाला दांड्याने मारहाण करून खिशातील १० हजार रुपए काढुन घेतले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
मला चार हजार रुपए दे, असे म्हणून संदिप नालकर या तरुणाला शिवीगाळ व मारहाण करत त्याच्या खिशातील १० हजार रुपए काढुन घेतल्याची घटना राहुरी तालूक्यातील सात्रळ येथे दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी घडलीय.
संदीप रावसाहेब नालकर, वय २९ वर्षे, हा तरूण राहुरी तालूक्यातील सात्रळ येथे राहत असून त्याचा दुध डेअरीचा व्यवसाय आहे. दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.१५ वा. चे सुमारास संदिप नालकर हा तरूण त्याच्या मोटार सायकलवरुन डेअरीकडे जात होता. तेव्हा धानोरे चौकामध्ये त्याच्या ओळखीचा संदेश प्रताप लोंढे हा संदिप नालकर याच्या डेअरी जवळ आला.
त्यावेळी त्याने त्याच्या मोटरसायकल ला असलेला लाकडी दांडा हातात घेवुन संदिप नालकर याला म्हणाला कि, मला चार हजार रुपये दे, असे म्हणुन त्याने शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर त्याने संदिप नालकर याच्या खिशातील दहा हजार रुपये बळजबरीने काढुन घेतले. तसेच माझे विषयी तक्रार करशील तर तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करील, असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर संदीप रावसाहेब नालकर याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानूसार आरोपी संदेश प्रताप लोंढे, रा. धानोरे, ता. राहुरी. याच्या विरोधात गून्हा रजि. नं. १३१२/२०२३ भादंवि कलम ३२४, ३२७, ५०४, ५०६ प्रमाणे गून्हा दाखल केलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
