Type Here to Get Search Results !

राहुरी - बांध सरळ करण्याच्या कारणावरुन विलास शेंडगे यांना लाथा बूक्क्यांनी व दांड्याने मारहाण

 बांध सरळ करण्याच्या कारणावरुन विलास शेंडगे यांना लाथा बूक्क्यांनी व दांड्याने मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


गावातील प्रतीष्ठित लोकांना बोलावुन घेतले आहे, त्यांच्या मदतीने बांध सरळ करुन घेवु, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी विलास शेंडगे यांना शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना राहुरी तालूक्यातील गंगापुर येथे दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी घडलीय. 


विलास भागाजी शेंडगे, वय ५५ वर्षे, हे राहुरी तालूक्यातील गंगापुर शिवारात. राहत आहेत. त्यांच्या शेतीलगत सुर्यभान ममताजी भुजबळ यांची शेतजमीन असुन ते सदर ठिकाणी रहावयास आहेत. शेंडगे व भूजबळ यांच्यात सामाईक बांध असुन त्यावरुन दोघांत नेहमी वाद सुरु असतात.


दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वा. चे सुमा विलास शेंडगे हे त्यांच्या शेत गट नं. ५८ मधील शेतीचे बांध वाकडे झाल्याने गावातील लोकांचे मदतीने बांध सरळ करुन घेणार होते. परंतु सदर ठिकाणी गावातील लोक यायचे आगोदर तेथे आरोपी आले. व शिवीगाळ करु लागले.


 त्यावेळी विलास शेंडगे त्यांना म्हणालो की, मी गावातील प्रतीष्ठित लोकांना बोलावुन घेतले आहे. ते आले की, त्यांचे मदतीने बांध सरळ करुन घेवु. असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने आरोपी म्हणाले की, तु कोणालाही बोलव बांध सरळ करु देणार नाही. 


असे म्हणुन मला शिवीगाळ करत तुझ्याकडे पाहतो असे म्हणुन आरोपींनी विलास शेंडगे यांना लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच पुन्हा येथे बांध सरळ करायला कोणाला बोलावले तर तुला जिवे ठार मारून टाकु, अशी धमकी दिली. 


विलास भागाजी शेंडगे यांनी घटनेनंतर राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी सुर्यभान ममताजी भुजबळ, बाळासाहेब ममताजी भुजबळ, इंद्रायणी सुर्भान भुजबळ, मंगल बाळासाहेब भुजबळ या चार जणांवर गून्हा रजि. नं. १३१३/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आलाय.