अवकाळी पाऊस व गारपीठामुळे पिकाचे नुकसानी बाबत शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
२५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीठामुळे झालेले शेतकऱ्यांचे उभ्या पिकाचे नुकसानी संदर्भात दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुरी शहरातील व तालुक्यातील शेतकरी व शेतकरी शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उपरोक्त विषयास अनुसरून शिवसेना राहुरी शहर प्रमुख गंगाधर सांगळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्याचे तहसीलदार व कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले.
त्या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये
दि. २५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटामुळे शेतकऱ्यांची अतोनात पिकाचे नुकसान झाले. यंदाच्या हंगामी काळात आधीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यातच कुठे बळीराजा सावरतो ना सावरतो तोच या अवकाळी पावसाने घाला घातला. याची संपूर्ण माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषी मंत्री यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन तातडीने शेतकऱ्यांच्या पिकाचे व काही वित्तहानी बाबत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून इकडे सादर करणे विषयी आदेश जारी केले.
पुढे शेतकरी बांधव आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की,
सदर झालेल्या अवकाळी पावसामुळे फक्त गारपीट मुळेच शेतीचे नुकसान झाले आहे, असे म्हणता येणार नाही.
तर झालेल्या अवकाळी अतिदृष्टीमुळे देखील शेतकऱ्यांचे उभे उभे पिकाचे नुकसान होऊन पिके जमीन दोस्त झाली आहेत.
तरी आपण फक्त गारपिटाचा अहवाल व पंचनामा न सादर करता संपूर्ण शेतीतील पिकाचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे. कारण शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई व पिक विमा लवकरात लवकर मिळेल.
त्यांना पुढील पिकाचा होणारा खर्च उपलब्ध होईल
त्या अनुषंगाने आम्ही आपणास सूचित करतो की आपण आपल्या स्तरावरती संबंधित अधिकारी यांना पंचनामे संदर्भात आदेश जारी करावेत. त्याबाबत संबंधित अधिकारी लोकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावे व तसा अहवाल शासन दरबारी सादर करावा. त्याची एक प्रत आम्हास मिळावी.
आपणाकडील मिळालेल्या अहवालानुसार शिवसेना राहुरी शहर प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांची भेट घेऊन वरील परिस्थिती संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ घेतील. असे निवेदनात म्हटले आहे.
