Type Here to Get Search Results !

राहुरी - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन अभियान.

 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन अभियान.



डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करुया, एक वही- एका पेनाने !


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट (फॅम) यांच्या वतीने "एक वही एक पेन" अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात हजारो नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. 


महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनात नरक यातना सहन करत आपले शिक्षण पूर्ण केले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मुलमंत्र देऊन त्यांनी समाज कार्य केले. समाज कार्य करीत असताना त्यांनी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा केली नाही. 


अशा या महामानवाच्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहुरी शहरातील राजवाडा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजेपासून अभियान राबविण्यात येणार आहे.


फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट (फॅम) यांच्या तर्फे आयोजित क्रांतीकारी ‘एक वही एक पेन’ अभियानाच्या सातव्या पर्वाच्या नियोजन प्रक्रियेचे सक्रिय सदस्य होण्यासाठी "अनुप साळवे- ९५२७५८४९८६" यांच्याशी संपर्क करावा. 


तसेच एक वही एक पेन अभियानात शहर व तालुक्यातील नागरिकांनी वही व पेन दान करून सक्रिय सहभाग घ्यावा. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.