Type Here to Get Search Results !

राहुरी - लहान मुलांच्या कारणावरुन आई व वडिलांना लाथा बूक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण

 लहान मुलांच्या कारणावरुन आई व वडिलांना लाथा बूक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


आमच्या मुलाला तूमच्या मुलाने ढकलून का दिले. असे म्हणत आरोपींनी गणेश कदम यास लाथा बूक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी तालूक्यातील रेल्वे स्टेशन येथे दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी घडलीय. 


गणेश बबन कदम, वय ३२ वर्षे, रा. राहुरी रेल्वे स्टेशन, राहुरी. या तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २.३० वा. चे सुमारास गणेश कदम व त्याची पत्नी प्रियंका हे त्यांच्या घरासमोर उभा होतो. त्यावेळी त्यांच्या जवळच राहणारा राजु गिरी याची मुलगी पुजा हि आमचे घरासमोरील रोडवरुन दुकान जात असतांना पडली व रडत रडत तिच्या घरी गेली.


 त्यानंतर आरोपी आले व म्हणाले कि, तुमच्या मुलाने आमच्या मुलीस का ढकलले. असे म्हणुन शिवीगाळ करु लागले. त्यावेळी प्रियंका कदम या त्यांना म्हणाल्या की, माझ्या मुलाने तुमच्या मुलीला ढकलेले नाही. ती स्वतः रस्त्याने जात असतांना पडली आहे. 


असे समजावुन सांगत असतांनाचा आरोपींना राग आला. त्यांनी गणेश कदम व त्याची पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करुन लाथा बूक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण करत जखमी केले. तसेच तु जर माझे नादी लागला तर तुझा मुडदाच पाडुन टाकीन, अशी धमकी दिली आहे. 


घटनेनंतर गणेश बबन कदम याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी रत्नाबाई राजु गिरी, भाग्यश्री राजु गिरी, राजु गिरी. सर्व रा. राहुरी रेल्वे स्टेशन, राहुरी. यांचेविरुध्द गून्हा रजि. नं. १२८२/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आलाय.