Type Here to Get Search Results !

पारनेर : प्रदुषण मुक्त व पर्यावरण पुरक दिपावलीची प्रतिज्ञा - पर्यावरण पुरक आकाश कंदीलांची निर्मिती

 प्रदुषण मुक्त व पर्यावरण पुरक दिपावलीची प्रतिज्ञा

पर्यावरण पुरक आकाश कंदीलांची निर्मिती




पर्यावरण हाणी हा सध्या जगभरातील गंभीर विषय आहे. वाढते तापमान आणि त्याचे घातक परिणामांची चर्चा सध्या जगभरात सुरु आहे. अशावेळी पर्यावरणपूरक भूमिका घेणे आवश्यक आहे. मात्र दिपावली मध्ये फटाक्यांच्या अतिवापरामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषणात कमालीची वाढ होते. याचा परिणाम म्हणजे मोठमोठ्या शहरांसह गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढलेली दिसते. म्हणून आपण दीपावलीच्या प्रसंगी कमीतकमी फटाके उडवून प्रदूषण मुक्त व आरोग्यदायी दीपावली साजरी केली पाहिजे. यासाठी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी प्रदूषण मुक्त दीपावलीची प्रतिज्ञा घेतली. यावेळी मुख्याध्यापक संदीप महांडूळे, राष्ट्रीय हरित सेना योजना प्रमुख लतीफ राजे, शिक्षक वसंत काळे, राजाराम वाघ, संतोष पटेकर, देवका पायमोडे, प्रशांत पादीर, कृष्णा धुमाळ, समाधान भुसारे तसेच शिक्षिका मनीषा गर्जे, रशिदा तांबोळी, संगीता मोरे, भावना बेरड, सोनाली नारायणे आदी उपस्थित होते.




         याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व प्रतिज्ञा देताना शिक्षक लतीफ राजे म्हणाले की दिवसेंदिवस दिल्ली, मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. तेव्हा दिपावली प्रसंगी फटाके उडविण्याचे प्रमाण कमी केले तर त्याचा पर्यावरणाला नक्कीच फायदा होईल. म्हणून विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली आहे. याप्रसंगी शिक्षक राजाराम वाघ व भावना बेरड यांच्या चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाश कंदीलांचे प्रदर्शन करण्यात आले होते. लहान वयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाश कंदीलाचे मुख्याध्यापक संदीप महांडूळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदनही केले.