Type Here to Get Search Results !

मंचर - पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी स्वराने बिबट्याला उडवल्याची घटना घडली आहे

 पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी स्वराने बिबट्याला उडवल्याची घटना घडली आहे



रात्रीच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी स्वराकडून बिबट्याला उडवल्याची घटना घडली असून बिबट्या जखमी अवस्थेत होता याची माहिती राणा प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांना मिळताच संग्राम सावंत यांनी वनविभागाला बिबट्या हा जखमी अवस्थेत आहे असे कळवीले असता वनपरिक्षेत्र अधिकारी  स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमने बिबट्याला जेरबंद केले असून पुढील उपचारासाठी नेले आहे

यावेळी रेस्क्यू टीम कर्मचारी रईस मोमीन 'कोंडीभाऊ डोके 'कुणाल घुले 'ऋषिकेश कोकणे 'मनोज तळेकर 'संजय शिंदे 'मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश दळवी 'होमगार्ड कृष्णा कोटकर 'आदींनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मदत केली