Type Here to Get Search Results !

राहुरी - भोंग्याचा आवाज कमी करा असे म्हणाल्याचा राग आल्याने लाकडी दांडे व राॅडने मारहाण

 भोंग्याचा आवाज कमी करा असे म्हणाल्याचा राग आल्याने लाकडी दांडे व राॅडने मारहाण.



५ जण जखमी तर सुमारे ७० जणांवर मारहाण व दंगलीचे गून्हे दाखल.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


भोंग्याचा आवाज कमी करा, आमचे घरात लहान मुले व वयस्कर माणसे आहेत. असे म्हणाल्याचा राग आल्याने सुमारे ७० आरोपींनी एकत्र येऊन ५ जणाला लाकडी दांडे, लोखंडी रोड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील गुहा येथे काल दि. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली.


काल दि. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजे दरम्यान राहुरी तालूक्यातील गुहा येथे असलेल्या दर्ग्याच्या पाठीमागे मोठ्या आवाजात भोंगा लावून भजन चालू होते. तेव्हा रज्जाक हबीब शेख हे त्यांना म्हणाले कि, भोंग्याचा आवाज कमी करा, आमचे घरात लहान मुले व वयस्कर माणसे आहेत. असे म्हणाल्याचा राग आल्याने तेथील आरोपींनी फोन करुन गावातुन लोकांना बोलावुन घेतले.


त्यावेळी तेथे सुमारे ७० जण हातात लाकडी दांडके व लोखंडी रॉड घेवुन आले. आणि त्यांनी मस्जिदला व दर्ग्याला लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. मस्जीदच्या पाण्याच्या टाक्या व काचा फोडुन नुकसान केले. तसेच दर्ग्यावर लावलेले झेंडे काढुन दर्ग्याची विटंबना केली. त्यानंतर रज्जाक शेख यांच्या घरासमोर लावलेल्या चार मोटार सायकलचे व एका ॲपे रीक्षाची तोड फोड करुन नुकसान केले.


सदर प्रकारामुळे फिर्यादी व साक्षीदार घाबरल्याने ते त्यांचे घरात जावुन बसले होते. त्यावेळी आरोपींनी इसाक भिक्कन शेख, मुन्नीर भिक्कन शेख, इसाक हबीब शेख, युन्नुस चॉदभाई शेख, मैमुना युन्नुस शेख यांना लाकडी दांडे, लोखंडी राॅड व लाथा बूक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले.


रज्जाक हबीब शेख, वय ५६ वर्ष, रा. गुहा, ता. राहुरी. यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) किरण भगवान कोळसे २) नंदकुमार बाबुराव सौदागर ३) हर्षल अनिल कोळसे ४) ऋषीकेश बांगरे ५) शशि भास्कर कोळसे ६) लहानु श्रीराम कोळस ७) अनिल मच्छिंद्र सौदागर ८) किरण बाळासाहेब डौले ९) गौरव नंदकुमार सौदागर १०) सागर शाम खपके ११) दिपक भगवान कोळसे १२) अक्षय विजय शिंदे 


१३) रवि बाळासाहेब डौले १४) दर्शन शंकर खपके १५) कार्तीक किरण कोळसे १६) संतोष पोपट सौदागर १७) श्रीहरी बाळासाहेब आंबेकर १८) ऋषीकेश भास्कर कोळसे १९) मुकेश मच्छिंद्र चंदे २०) राहुल सुनिल उ-हे २१) यशवंत भाउसाहेब चंद्रे २२) डॉ. विजय सुखदेव वाबळे २३) संतोष पोपट सौदागर २४) शरद गोरक्षनाथ कोळसे २५) गणेश शेळके २६) मच्छिंद्र गजानन कोळसे २७) नवनाथ जालिंदर कोळसे २८) पोपट सोपान डौले २९) मच्छिंद्र साहेबराव आआंबेकर ३०) साईनाथ पवार ३१) गौरव वाघ 


३२) मच्छिंद्र एकनाथ शिंदे ३३) कैलास रामभाउ कोळसे ३४) वैष्णव शाम खपके ३५) अक्षय अशोक कोळसे ३६) सचिन नानासाहेब कोळसे ३७) रामा सखाहरी मदने ३८) बाळासाहेब गोपाळ जगताप ३९) संतोष परशुराम सौदागर ४०) डॉ संदिप गोरक्षनाथ कोळसे ४१) रविंद्र साहेबराव आंबेकर ४२) नामदेव गोविंद कुचेकर ४३) प्रसाद मानिक कोळसे ४४) संजय गंगाराम कोळसे ४५) अतुल दत्तु कोळसे ४६) लहु ज्ञानदेव काकडे ४७) रोहीत संपत डौले ४८) सुनिल जग्गनाथ सौदागर ४९) अमोल अनिल कोळसे ५०) आकाश दत्तु पुजारी ५१) दत्तु पुजारी ५२) गणेश शांताराम राउत


 ५३) ज्ञानेश्वर अशोक सौदागर ५४) गोपीनाथ कारभारी वर्षे ५५) सुभाष कोळसे ५६) शरद वाबळे ५७) शंकर किसन मांजरे ५८) अरुण पाडुरंग लांबे व इतर १० ते १२ अनोळखी इसम सर्व रा. गुहा ता. राहुरी. अशा सुमारे ७० जणांवर गून्हा रजि. नं. १२७५/२०२३ भादंवि कलम ३२४, ३२३, १४३, १४७, १४९, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आलाय. 


या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक कौशलरामनिरंजन वाघ हे करीत आहे.