Type Here to Get Search Results !

चांदवड - 30,000/- रु ची लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून ती पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

 ==  प्रेसनोट ==

यशस्वी सापळा कारवाई

▶ युनिट - नाशिक 

▶ तक्रारदार- पुरुष,वय-20

▶ ईलोसे- 

1) भास्कर पुंडलिक गांगुर्डे वय 55 वर्ष धंदा शेती व सरपंच, सोग्रस, रा. सोग्रस, तालुका-चांदवड, जिल्हा नाशिक.

2) प्रकाश चंद्रभान गांगुर्डे वय 45 वर्ष,धंदा शेती व उपसरपंच- सोग्रस,रा. सोग्रस, तालुका-चांदवड, जिल्हा- नाशिक.

▶ लाचेची मागणी-

         50,000/- रुपये तडजोडी अंती 30,000/- रूपये स्वीकारण्याचे मान्य केले.

▶ लाच स्विकारली-

         30,000/ रुपये

▶ हस्तगत रक्कम-  

         30,000/-रुपये 

▶ * लाचेचे कारण* 

यातील तक्रारदार यांच्या  मित्राने जिल्हा परिषद अंतर्गत मौजे सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र सदर बांधकामाचे बिल अद्याप अप्राप्त होते. सदर बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकारपत्र प्राप्त होते. सदर पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंच या नात्याने ईलोसे क्र १ यांनी सही करून पाठवण्यासाठी इलोसे क्र १ व २ यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 50,000/-  रु ची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30,000/- रु ची लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून ती पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

▶ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶ सापळा अधिकारी - अनिल बडगुजर,

पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक. मो. नं. 8999962057



▶ सापळा पथक       

1) पो.ना. दिपक पवार.

2) पो.शि. संजय ठाकरे

▶ मार्गदर्शक- 

1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

मोबा.नं. 9371957391

 2) मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. 

मो नं 9404333049

▶ सहकार्य - श्री.नरेंद्र पवार. वाचक, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

मोबा.नं. 9822627288

---------------------

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक 

@ टोल फ्रि क्रं. 1064

==============