केंद्र शासनाच्या शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
सर्वसामान्य लोकांना केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांची माहिती देणे. तसेच वंचित राहिलेल्या घटकापर्यंत लाभ पोहचविणे, यासाठी राहुरी शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राहुरी नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.
या विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट असे आहे कि, केंद्राच्या विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु, लाभापासुन वंचित राहिलेल्या, घटकां पर्यंत लाभ पोहोचवणे, जनते पर्यंत केंद्र सरकारच्या योजनांची माहिती पोहचवून त्याची जनजागृती करणे. तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधने, निश्चित केलेल्या पात्रते नुसार संभाव्य लाभार्थ्यांची या विकसित संकल्प भारत यात्रेमध्ये नोंदणी, अश्या प्रकारची कामे करण्यात येणार आहे.
राहुरी नगरपरिषद हदीतील 2 ठिकाण निश्चित केलीआहेत. दिनांक 30/12/2023 रोजी सकाळी 9.30 या वेळेत राहुरी नगरपरिषद, राहुरी, व दुपारी 2.30 या वेळेत सौ. भागीरथीबाई तनपुरे कन्या माध्य व उच्च माध्यमिक शाळेजवळ येथे विकसित भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी राहुरी शहरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी केले आहे.
