अण्णासाहेब आवटे महाविद्यालयास 'नॅक' कडून 4th cycle मध्ये 'A' ग्रेड
मंचर - येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयास नॅक कडून “A” ग्रेड (CGPA 3.06) प्राप्त झाली आहे. दि.२९ व ३० नोव्हेंबर २०२३ रोजी नॅक मूल्यांकन समितीने भेट देऊन महाविद्यालयाचे विविध अभ्यासक्रम, उपक्रम, विविध सुविधा, विद्यार्थी, शिक्षक इ.चे मूल्यांकन केले. या मूल्यांकन समितीच्या पीअर टीममध्ये चेअरमन म्हणून डॉ. अविनाश तिवारी, कुलगुरू, जिवाजी विद्यापीठ, ग्वाल्हेर (मध्यप्रदेश), डॉ. लक्ष्मी हरीबंडी, प्रोफेसर, इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी, हैद्राबाद (तेलंगणा), डॉ. तिरुपती राव छापरा, प्राचार्य, गव्हरमेंट डीग्री कॉलेज, आंध्रप्रदेश, यांनी महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन केले. महाविद्यालयाचे नॅक पूर्ण होण्यासाठी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी, सचिव मा. विकास देशमुख , सहसचिव डॉ. डी.के.म्हस्के यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
महाविद्यालयास 'A' ग्रेड मिळाल्याबदल ऋणनिर्देश सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. बाळासाहेब बेंडे पाटील, मा. उदय पाटील, मा. बाळासाहेब बाणखेले, मा. राजाराम बाणखेले, मा. अजय आवटे, घोडेगाव महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. सुरेश भोर, मा. निलेश शेळके उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी महाविद्यालयाने मिळविलेल्या यशाचे कौतुक केले. तसेच पुढील काळात अजून चांगले प्रयत्न करून महाविद्यालयास A+ ग्रेड मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एस. गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाच्या एकूण कामगिरीचा आढावा घेऊन भविष्यात महाविद्यालयात नॅकच्या आवश्यकतेनुसार संशोधन, विद्यार्थी पूरक विविध सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.के.जी. कानडे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ बी.पी. गार्डी, नॅक समन्वयक डॉ. जी. सी. वाघ, सर्व क्रायटेरिया प्रमुख, ऑफीस प्रमुख श्री. मेचकर, उपप्राचार्य डॉ. व्ही . डी. सदाफळ, उपप्राचार्य डॉ. एस.एन.बोलभट, उपप्राचार्य संजय पवळे इत्यादींचे मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले. समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक नॅक समन्ययक डॉ. जी.सी.वाघ यांनी तर आभार प्रदर्शन प्रभारी प्राचार्य डॉ. बी.पी.गार्डी यांनी केले. डॉ. श्रध्दा म्हांकाळ व प्रा. कैलास एरंडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, आजी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
