Type Here to Get Search Results !

राहुरी - दुसरे लग्न करण्यास विरोध केल्याने पत्नीच्या अंगावर गरम तेल टाकुन जखमी केले.


 

दुसरे लग्न करण्यास विरोध केल्याने पत्नीच्या अंगावर गरम तेल टाकुन जखमी केले.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


मी दुसरे लग्न करणार आहे, असे म्हणत पतीने पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्यानी मारहाण केली. तसेच पत्नीच्या अंगावर गरम तेल टाकुन जखमी केले. ही घटना राहुरी तालूक्यातील टाकळीमियाॅ येथे दिनांक २४ ऑक्टोबर रोजी घडली होती. या घटने बाबत १२ डिसेंबर २०२३ रोजी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. 


हर्षाली ज्ञानेश्वर झावरे, रा. टाकळीमियाॅ, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, त्यांचा विवाह टाकळीमियाॅ येथील ज्ञानेश्वर अशोक झावरे याच्या सोबत झाला होता. विवाह प्रसंगी वडीलांनी संसार उपयोगी वस्तु व तीन लाख रुपये दिले होते. 


सन २०२२ मध्ये त्यांचे सासु, सारे व पती यांनी शारीरीक व मानसीक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास हर्षाली झावरे ह्या त्यांच्या पतीला म्हणाल्या की, तुम्ही रोज दारु पीता व नेहमी कोणा सोबत बोलता. यावर पती हे म्हणाला की, मी आता दुसरे लग्न करणार आहे. तीच्याशीच मी बोलत आहे.


 असे म्हणाले असता हर्षाली झावरे पतीला म्हणाल्या की, मी असताना तुम्ही दुसरे लग्न करु शकत नाही. असे म्हणाल्याचा पती ज्ञानेश्वर झावरे यास राग आल्याने त्याने पत्नी हर्षाली यांना घाण घाण शिवीगाळ करत लाथाबुक्यानी मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावर गरम तेल टाकुन दुखापत केली. 


घटनेनंतर हर्षाली ज्ञानेश्वर झावरे यांनी दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर अशोक झावरे, अशोक भाऊ झावरे, मनिषा अशोक झावरे, सर्व रा. टाकळीमियाॅ, ता. राहुरी. यांच्यावर गून्हा रजि. नं. १३६२/२०२३ भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आलाय. 


या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.