Type Here to Get Search Results !

राहुरी - येण्या जाण्याचा रस्ता का नांगरला, असे म्हणत विकास पाटीळे याला मारहाण.


 

येण्या जाण्याचा रस्ता का नांगरला, असे म्हणत विकास पाटीळे याला मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


आमच्या येण्या जाण्याचा रस्ता का नांगरला, असे म्हणत चार जणांनी मिळुन विकास पाटीळे या तरुणाला धक्काबूक्की करत कोणत्यातरी टणक हत्याराने मारुन जखमी केले. ही घटना दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी राहुरी तालूक्यातील बाभुळगाव येथे घडलीय. 


विकास लक्ष्मण पाटोळे, वय २७ वर्षे, रा. बाभुळगाव, ता. राहुरी. या तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वा. सुमारास विकास पाटोळे त्याचे शेत नांगरणी करुन वांग्याचे खोडे गोळा करित होता. 


तेव्हा तेथे आरोपी आले व म्हणाले कि, तु आमच्या येण्या जाण्याचा रस्ता का नांगरला आहे. त्यावेळी विकास पाटोळे त्यांना म्हणाला की, शेती आमची आहे. या ठिकाणी रस्ता नाही. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी विकास पाटोळे याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.


तसेच टणक हत्याराने मारुन दुखापत केली. त्यानंतर विकास पोटोळे याने आरडाओरड केल्याने त्याचे आई वडील त्या ठिकाणी आले. तेव्हा आरोपींनी त्यांना देखील धक्काबुक्की केली. आणि तुमचा एक दिवस बेतच पाहु, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. 


विकास लक्ष्मण पाटोळे याच्या फिर्यादीवरून आरोपी भिमराज विलास पाटोळे, मंदाबाई विलास पाटोळे, गणेश वसंत पाटोळे, अंतीकाबाई वसंत पाटोळे, चौघे रा. बाभुळगाव, ता. राहुरी यांच्यावर गून्हा रजि. नं. १३७१/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आलाय.