Type Here to Get Search Results !

राहुरी - दोन जर्शी गाय रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पळवील्या

 दोन जर्शी गाय रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पळवील्या.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या दरम्यान ५५ हजार रुपए किंमतीच्या एक जर्शी गाय व एक कालवड चोरुन नेल्याची घटना राहुरी काॅलेज परिसरात दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी घडलीय. या घटनेमुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कृष्णा रामदास पोपळघट, वय ३६ वर्षे, हे राहुरी शहरात आझाद चौक, लोहार गल्ली येथे राहत असून त्यांची शेतजमीन राहुरी काॅलेज जवळ आहे. त्यांच्याकडे दोन जर्सी जातीच्या दोन गाई असुन कृष्णा पोपळघट यांचे वडील रामदास पोपळघट हे त्यांचा चारापाणी करत असतात.


दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान रामदास पोपळघट हे त्यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील गाईंना चारापाणी करुन गोठ्याचे दार बंद करुन घरी निघुन आले होते. दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ६ वाजे दरम्यान रामदास पोपळघट हे नेहमी प्रमाणे गाईचे दुध काढणे व चारापाणी करणे करीता शेतात गेले असता त्यांना सदर गोठ्यात गाई दिसल्या नाही. 


पोपळघट यांनी आजु बाजुचे परिसरात सदर गाईचा शोध घेतला. परंतु त्या मिळुन आल्या नाही. त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने ५५ हजार रुपए किंमतीच्या एक जर्शी गाय व एक कालवड चोरुन नेल्याचे पोपळघट यांच्या लक्षात आले. 


कृष्णा रामदास पोपळघट यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गून्हा रजि. नं. १३४९ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गून्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.