काठीने मारहाण करुन तुम्ही राहाता ती जागा आमची आहे, तुम्ही येथे राहायचे नाही, अशी धमकी.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तुम्ही राहाता ती जागा आमची आहे, तुम्ही येथे राहायचे नाही. असे म्हणुन शिवीगाळ, धक्काबूक्की करत काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे दिनांक. २ डिसेंबर २०२३ रोजी घडलीय.
मंदा सोपान हापसे, वय ४० वर्षे, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वा. चे सुमारास मंदा हापसे व त्यांचा पुतन्या घरी असताना तेथे आरोपी आले व मला म्हणाले की, तुम्ही राहाता ती जागा आमची आहे. तुम्ही येथे राहायचे नाही.
असे म्हणुन मला त्यांनी शिवीगाळ केली. त्यावेळी मंदा हापसे त्यांना म्हणाल्या की, हे घर आमच्या सासु सासरेनी बांधलेले आहे. आम्ही येथेच राहणार. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी वाईटवाईट शिवीगाळ करुन, धक्काबुक्की करत लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहान करुन दुखापत केली आहे.
तसेच तुम्ही येथुन घर सोडुन निघुन गेले नाहीतर तुम्हाला जिवे ठार मारुन टाकु, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर मंदा सोपान हापसे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी १) ज्ञानदेव नामदेव हापसे, २) मयुरी आप्पासाहेब हापसे, ३) आनिता ज्ञानदेव हापसे, ४) आप्पासाहेब ज्ञानदेव हापसे, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी. तसेच ५) राजेद्र शेटे, ६) मंगल राजेद्र शेटे, रा. गणेशवाडी, ता. नेवासा.
या सहा जणांवर गून्हा रजि. १३३०/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४७, प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
