Type Here to Get Search Results !

राहुरी - मच्छिंद्र शिंदे यांना लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण, तिघांवर गून्हा दाखल.


 


मच्छिंद्र शिंदे यांना लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण, तिघांवर गून्हा दाखल.

राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.

पाईलाईचे कामाचे स्टिल मटेरियल व क्रेसेन मटेरियल घेऊन जात असताना मज्जाव केला म्हणून मच्छिंद्र शिंदे यांना लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील वरवंडी येथे दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी घडलीय. 

राहुरी तालूक्यातील वरवंडी येथे जलजीवन पाईपलाईनचे काम सुरु आहे. ते काम जयबजरंग कन्स्ट्रक्शन यांनी घेतले असून त्या ठिकाणी मच्छिंद्र रामदास शिंदे हे सुपरवायझर म्हणून नोकरीस आहेत. 

दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी १० वा. चे सुमारास मच्छिंद्र शिंदे हे नेहमी प्रमाणे वरवंडी येथे चालु असलेल्या जलजीवन पाईपलाईनचे कामाची पहाणी करण्या करिता गेले. तेव्हा आरोपी हे कामाच्या ठिकाणी ठेवललेले १५ हजार रुपए किंमतीचे पाईलाईच्या कामाचे स्टिल मटेरियल व क्रेसेन मटेरियल एक बैलगाडीत भरीत होते. तेव्हा मच्छिंद्र शिंदे त्यांना म्हणाले कि, तुम्ही हे मटेरियल कोणाला विचारुन भरता.

 तेव्हा ते मला म्हणाले की, तु कोण आहे. तुझा विचारण्याचा काय संबंध, असे बोलुन वाईट वाईट शिवीगाळ करुन आरोपींनी मच्छिंद्र शिंदे यांना लाकडी दांडा व लाथाबुक्याने मारहान केली. तसेच त्यांच्या खिशातील पाकिट हे काढुन घेतले. आणि जर आमच्या नादी लागला तर तुला सोडणार नाही. अशी धमकी देवुन आरोपी मटेरीयल घेऊन निघुन गेले.

मच्छिंद्र रामदास शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अशोक बरे, अर्जुन बरे, गणेश गर्दै सर्व रा. वरवडी ता. राहुरी. यांच्यावर गून्हा रजि. नं. १३२७/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ३२७, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आलाय.