Type Here to Get Search Results !

संगमनेर - धांदरफळ बु येथील निवृत्त कामगार तलाठी कै.खंडु लक्ष्मण म्हस्कुले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

 धांदरफळ बु येथील निवृत्त कामगार तलाठी कै.खंडु लक्ष्मण म्हस्कुले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन



संगमनेर शाविद शेख --- 


संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बु येथील निवृत्त कामगार तलाठी कै.खंडु लक्ष्मण म्हस्कुले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले आहे .

       कै.खंडु म्हस्कुले यांनी कोपरगाव येथेच शिक्षण घेऊन कामगार तलाठी झाले व कोपरगाव येथेच निवृत्तही झाले होते.त्यांनी कोपरगाव,संगमनेर,राहता, अकोले या तालुक्यात कामगार तलाठी म्हणून नोकरी सेवा केली असल्याने त्यांचा उत्तर नगर जिल्ह्यात चांगला जनसंपर्क होता.काल दि.६ डिसेंबर २०२३ रोजी त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने त्याचे निधन झाले त्यांच्यावर धांदरफळ बु येथील रामेश्वर जवळील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

   कै खंडू लक्ष्मण म्हस्कुले यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, भाऊ,बहिण,भावजई,पुतणे,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे संगमनेर येथील भक्ती कॅाम्प्युटरचे संचालक अमोल व प्रवीण यांचे तेच वडिल होत.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.