Type Here to Get Search Results !

राहुरी - एक वही एक पेन उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.


 


एक वही एक पेन उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.


डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहुरी शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


राहुरी शहरातील बुद्ध विहारात धम्मदिप मित्र मंडळ व जय भीम मित्र मंडळ यांच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन उपक्रम राबवून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


 या वेळी सत्येंद्र तेलतुंबडे, मा. नगरसेवक संजय साळवे, अरुण साळवे, प्रबुद्ध भारत चे अप्पासाहेब मकासरे, रिपाइंचे विलास साळवे, बार्टीचे एजाज पिरजादे, सागर साळवे, दादु साळवे, जगन्नाथ सूर्यवंशी, सचिन मेहेत्रे, दिपक साळवे, किरण साळवे, अनुसगम शिंदे, रवींद्र शिरसाठ, रॉबर्ट सॅम्युएल, बोरकर आदी उपस्थित होते.


 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मदिप मित्र मंडळाचे अध्यक्ष अनुप साळवे, हर्षद साळवे, अजय साळवे, कृष्णा साळवे, संकेत भांबळ, विशाल साळवे, अनिकेत साळवे, अर्पण साळवे, दिलीप हिवाळे, विकास गायकवाड, भुषण साळवे, अजिंक्य शिंदे, अक्षय लोंढे, दीपक मोरे, सचिन साळवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.


राहुरी बस स्थानक येथे प्रबुद्ध भारत च्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सत्येंद्र तेलतुंबडे, प्रबुद्ध भारत चे अप्पासाहेब मकासरे, बार्टीचे एजाज पिरजादे, निवृत्त मुख्याध्यापक जगन्नाथ सूर्यवंशी, सचिन मेहेत्रे, स्थानक प्रमुख पठाडे, वाहतूक नियंत्रक लिहिणार भोसले आदि सह युवक उपस्थित होते.