Type Here to Get Search Results !

राहुरी - उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर नगर जिल्हा व राहुरी तालुका कार्यकारणी जाहिर

 उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर नगर जिल्हा व राहुरी तालुका कार्यकारणी जाहिर.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर नगर जिल्हा व राहुरी तालुका कार्यकारणी जाहिर झाली असून उत्तर नगर (शिर्डी लोकसभा) जिल्हा प्रमुखपदी पै. रावसाहेब खेवरे, उप जिल्हा प्रमुखपदी भागवत मुंगसे तर राहुरी तालुका प्रमुखपदी सचिन म्हसे, राहुरी शहर प्रमुखपदी डॉ. संजय म्हसे यांची निवड जाहीर करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. 


प्रसिद्ध केलेल्या पत्रकात उत्तर नगर जिल्हाप्रमुख (शिर्डी लोकसभा) पै. रावसाहेब खेवरे, उप जिल्हा प्रमुख भागवत निमसे (राहुरी), राहुरी तालुका प्रमुख सचिन म्हसे, राहुरी शहर प्रमुख डॉ. संजय म्हसे यांची निवड जाहिर करण्यात आली आहेे. तसेच विधानसभा संघटक- बाळासाहेब गाडे, विधानसभा समन्वयक- प्रशांत शिंदे, राहुरी शहर संघटक- विजय शिरसाठ, श्रीरामपूर विधानसभा संघटक (32 गावे, राहुरी)-राहुल चोथे, देवळाली प्रवरा शहरप्रमुख बाबासाहेब मुसमाडे, शहर समन्वयक तुषार शेटे, शहर संघटक अनिल चव्हाण यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहे. 


निवडीनंतर प्रतिक्रिया देताना जिल्हा प्रमुख पै. रावसाहेब खेवरे म्हणाले, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशा प्रमाणे जिल्ह्यात शिवसेनेला बळकटी आणून आगामी निवडणूकांमध्ये गद्दारांना चांगला धडा शिकवू. या पदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पक्षात नविन तरूणांना काम करण्याची संधी देऊन जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. त्यासाठी त्यांच्या पाठीशी मी नेहमी खंबीरपणे उभा असणार असल्याचे त्यांनी  सांगीतले.