टाकळीढोकेश्वर येथे नाताळ सण उत्साहात साजरा.
टाकळी ढोकेश्वर प्रतिनिधी.
टाकळी ढोकेश्वर येथे नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला टाकळी ढोके श्वर येथील न्यू अपोस्तोलिक चर्चमध्ये चर्च पास्टर विनोद गायकवाड यांनी उपस्थित सर्वांना ख्रिस्तजन्माचा संदेश दिला यावेळी परिसरातील सर्व ख्रिस्ती बांधव याठिकाणी उपस्थित होते २४ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना शुभेच्छा देऊन ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला २५ डिसेंबरला सकाळी साडे दहा वाजता भक्ती घेऊन बायबल वाचन पठण करून पास्टर विनोद गायकवाड व पास्टर अजय पंडित यांनी सर्वांना ख्रिस्तजन्माच्या संदेश दिला. यावेळी सर्व ख्रिस्ती बांधवांनी नाताळ सणाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या . यावेळी चर्चला सजावट करून आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली होती सायंकाळच्या वेळी गावातील सर्व लोकांसाठी अल्पोपहार व फराळाचे नियोजन करण्यात आले होते . यावेळी रवींद्र गायकवाड, सुबोध गायकवाड ,प्रमोद गायकवाड, राज गायकवाड ,मोहित गायकवाड, राहुल अल्हाट, , योहान गायकवाड , संतोष गायकवाड, श्याम अल्हाट, निशांत गायकवाड,
संदेश गायकवाड, कुणाल गायकवाड, विराज गायकवाड ,आदेश गायकवाड ,यांच्या सह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर पास्टर विनोद गायकवाड, पा.अजय पंडित, यांनी सर्वांचे आभार मानले.
