Type Here to Get Search Results !

श्रीगोंदा - शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात रक्तदान शिबिर ,वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन


शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात रक्तदान शिबिर ,वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन

श्रीगोंदा (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  खा.  शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 17 बटालियन एन.सी.सी. अहमदनगर , राष्ट्रीय छात्र सेना , विद्यार्थी कल्याण मंडळ,  राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जिल्हा रुग्णालय अहमदनगर रक्तपेढी आणि एच.डी.एफ.सी. बँक शाखा श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन  करण्यात आले. या शिबिरात  21 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.  रयत शिक्षण संस्था, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य ,माजी आ.  राहुलदादा जगताप यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.ते म्हणाले की,आजच्या तरुणांनी खा.  शरदचंद्रजी पवार यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व समजून घेतले पाहिजे.  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. बाबासाहेब भोस म्हणाले की,खा.  शरदचंद्रजी पवार हे राजकारणातील मुत्सद्दी नेतृत्व आहे. असं ते म्हणाले.  महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महावीर पटवा ,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. महादेव जरे,  उपप्राचार्य डॉ.  प्रकाश साळवे , वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. संजय अहिवळे ,जुनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा. हळनोर एस. बी. ,प्रा.  शहाजी मखरे हे या समारंभासाठी उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी एन. एस. एस. विभागप्रमुख, प्रा. रमेश थोरात ,प्रा. देवेंद्र बहिरम, एन.सी.सी. विभागप्रमुख लेफ्ट. रत्नाकर झिटे , विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख डॉ. ढवळे के.डी., जिमखाना विभागप्रमुख प्रा. कल्पना बागुल व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

जिमखाना विभागाच्यावतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले. 100 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा संचालक कल्पना बागुल, क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ यांनी परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याचे नियोजन प्रा. अनंत सोनवणे,  प्रा प्रतिमा शिंदे   यांनी केले.