छत्रपती संभाजीनगर ते भिमाकोरेगाव पदयात्रेचे नेवासात स्वागत
नेवासा ( शंकर नाबदे ) - चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात वास्तव्य असणारे भन्ते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या छत्रपती संभाजीनगर ते भिमाकोरेगाव सामाजिक क्रांती अभियान पदयात्रेचे वडाळा बहिरोबा येथे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी भोजनदान व धम्मदेसना देण्यात आली.
भन्ते विनयशील यांनी सामाजिक क्रांती अभियानाची भूमिका विषद केली.भन्ते ज्ञानज्योती महास्थवीर यांनी त्यांचे प्रवचनातून सध्याची राजकीय परस्थिती अराजकतेकडे नेणारी असून सर्व शासकीय यंत्रनेचे खाजगीकरण संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता नागरी हक्कावर गदा आणण्याचे प्रयत्न होत आहेत. ई. व्ही. एम. च्या माध्यमातून एकछत्री अंमल आणण्याचे प्रयत्न होत आहेत.यातून नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन केले.विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली क्रांती आणि प्रतिक्रांती विषद केली.
यावेळी सरपंच ललित मोटे उपसरपंच सचिन मोटे, बाबासाहेब मोटे नानासाहेब मोटे निलेश मोटे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशोक कांबळे,सागर तेलतुंबडे, आतिष गायकवाड,मोहित ऊबाळे बाळासाहेब वानखेडे, गणेश तेलतुंबडे, संतोष तेलतुंबडे, संतोष कोल्हे, गौरव कांबळे, आदित्य जगधने, जॉन भोसले, माणिक कांबळे, पोपट कांबळे, संदीप शिंदे, अभिषेक कवडे विनोद गायकवाड, अक्षय माळी, बिट्टू कांबळे, राम आढागले, इंगळे मेजर, राजू गायकवाड,नानासाहेब बनकर, भास्करमामा लिहिणार, सुनील वाघमारे,दिपक दांडगे,संजय वाल्हेकर, विकी बनकर यांनी मोलाचे सहकार्य केले, संतोष तेलतुंबडे व सर्व सहकारी यांनी उपस्थित मान्यवर व उपासक, उपासिका यांचे आभार मानले.
