दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचा अभिमानास्पद उपक्रम- मा. आ. कर्डिले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तालुक्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतः पुढाकार घेऊन लाभ मिळवून देण्याचा राहुरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचा उपक्रम निश्चितच अभिमानास्पद आहे. सर्वसामान्य नागरीकांना या योजनेचा मोठा आधार आहे. त्यामुळे शासनाने उत्पन्न मर्यादेत वाढ केली पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
राहुरी येथे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यापैकी सुमारे ६५ विद्यार्थ्यांना तसेच इतर मिळून सुमारे २७२ लाभार्थ्यांना प्रकरण मंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले. यावेळी माजी आ. कर्डिले बोलत होते. राहुरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विनित धसाळ, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, राहुरी तालुका भाजपा अध्यक्ष सुरेश बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, नानासाहेब गागरे, चांगदेव भोंगळ आदी उपस्थित होते.
माजी आ. शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, राहुरी तालुक्यात संजय गांधी निराधार योजना समितीची स्थापन झाल्यापासून चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. सुरुवातीला गुहा येथील आश्रमातील अनाथ मुलांना लाभ दिला. आता शाळेतील दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ दिला. अशा प्रकारे सर्वसामान्य घटकांना फायदा होईल असे काम समितीने केले आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांना उत्पन्न दाखल्याची अडचण येथे त्यामुळे उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे ही कर्डिले यांनी सांगितले. भाजपा तालुका अध्यक्ष सुरेशराव बानकर म्हणाले की, तालुक्यात समितीच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. परंतु गरजू व्यक्तींपर्यंत आपण पोहोचणे आवश्यक आहे.
योजनेचे अध्यक्ष विनित धसाळ यांनी प्रास्तविक करताना सांगितले की, समितीच्या पुढाकाराने तालुक्यातील ३०० दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आज सुमारे ७५ विद्यार्थ्यांना मंजुरीचे पत्र देण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही एजंट अथवा त्रयस्थ व्यक्तीकडे प्रकरण अथवा पैसे दूर नये तर सेतुमध्ये प्रकरण जमा करावे. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पात्र लाभार्थींना मंजुरी पत्र देण्यात आले. तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी योजनेची माहिती दिली. तसेच आभार मानले. जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी समिती सदस्य नारायण धनवट, संदीप आढाव, दिपक वाबळे, अजित डावखर, गोरख अडसुरे, किरण ससाणे, उत्तमराव खुळे, अविनाश बाचकर, भैय्यासाहेब शेळके, सुजय काळे, खा. विखे यांचे स्वीय सहाय्यक मनोज गव्हाणे, संजय गांधी शाखेचे संजय वाघ, नंदा मकासरे, भारत जरे, मंगेश साठे, समावेशीत शिक्षण समग्रशिक्षा अभियान शिक्षण विभागाचे विशेष तज्ञ नितीन शिंदे, किशोर खेमनर, नवनाथ चेमटे, सारिका सगळगिळे, सिमा शेलार आदींसह तालुक्यातील लाभार्थी उपस्थित होते.

