सामाईक जागा आहे, या ठिकाणी काही करु नको. असे म्हणाल्याचा राग आल्याने रभाजी खाडे यांना मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
ही आपली सामाईक जागा आहे, तु या ठिकाणी काही करु नको. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी रभाजी खाडे यांना लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी राहुरी तालूक्यातील गुंजाळे येथे घडलीय.
रभाजी विश्वनाथ खाडे वय ६३ वर्षे, हे राहुरी तालूक्यातील गुंजाळे येथे रहावयास आहेत. त्यांच्या शेजारी त्यांचा भाऊ आबाजी विश्वनाथ खाडे हा त्याच्या कुंटुबासह राहण्यास आहे. दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वा. चे सुमारास रभाजी खाडे हे घरी असताना तेथे प्रतिक आबाजी खाडे हा सामाईक जागेवर ओट्याचे काम करत होता.
तेव्हा रभाजी खाडे त्याला म्हणालो की, ही आपली सामाईक जागा आहे, तु या ठिकाणी काही करु नका. असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने तो म्हणाला की ही जागा माझ्या नावावर आहे. असे म्हणुन त्याने मला शिवीगाळ दमदाटी केली. तसेच सदर आरोपींनी मिळुन रभाजी खाडे व त्यांच्या पत्नीला लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. नंतर तुमचा बेतच पाहु अशी जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
रभाजी विश्वनाथ खाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रतिक आबाजी खाडे, आबाजी विश्वनाथ खाडे, अमोल आबाजी खाडे भावजई, छाया आबाजी खाडे, रा. गुंजाळे, ता. राहुरी. या चार जणांवर गून्हा रजि. नं. १३३४/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आलाय.
