Type Here to Get Search Results !

मोशी - मोशीतील नागरिकांसाठी उपलब्ध मैदानाला घोडेस्वार प्रशिक्षणासाठी देऊन परिसरातील मुलांचे मैदानी खेळ बंद करू पाहणाऱ्या प्रशासनाविरोधात आमरण उपोषण

 मोशीतील नागरिकांसाठी उपलब्ध मैदानाला घोडेस्वार प्रशिक्षणासाठी देऊन परिसरातील मुलांचे मैदानी खेळ बंद करू पाहणाऱ्या प्रशासनाविरोधात आमरण उपोषण



मोशी येथील 40 हून अधिक सोसायटींमधील मुलांच्या खेळाचे मैदान हॉर्स रायडिंग साठी धनदांडग्या उद्योगपतींच्या हातात देऊन प्रशासन मनमानी कारभार करत आहे. एकीकडे केंद्र सरकार "खेलो इंडिया" ला प्रोत्साहन देत असताना पालिका प्रशासन मात्र त्याविरोधात भूमिका घेताना दिसत आहे. या अन्यायी निर्णयाविरोधात आमच्या भगिनी सौ.रुपालीताई आल्हाट, श्री. परशुरामभाऊ आल्हाट व स्थानिक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. हा प्रकार जेव्हा समजला होता, तेव्हाच ताबडतोब आयुक्तांना पत्र पाठवून यासंबंधी स्थानिक जनतेची मागणी लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली होती. 


खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन या लढाईत सोबत असल्याचा विश्वास दिला. जर प्रशासन मनमानी कारभार करत असेल तर ही लढाई तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही उपस्थित सर्वांना दिली.