काॅलेज तरुणांच्या एका गटाकडून संकेत पठारे या तरुणाला दगड, फायटर व लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील वांबोरी येथे काॅलेज तरुणांचे दोन गट समोरा समोर आले. आणि मागील भांडणाच्या कारणावरुन एका गटाने संकेत पटारे या तरुणाला दगड, फायटर व लाथा बूक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना दिनांक ४ डिसेंबर रोजी घडलीय.
संकेत संजय पठारे, रा. वांबोरी (ढवळेवस्ती) ता. राहुरी. या काॅलेज तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, संकेत पठारे हा तरुण वांबोरी येथील कन्या माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत आहे. दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १ वा. चे सुमारास संकेत पठारे हा कॉलेजच्या जेवणाची सुट्टी झाल्याने त्याच्या मित्रांबरोबर गेटवर उभा होता.
तेव्हा आरोपी तेथे आले व म्हणाले कि, तुम्ही दोन चार दिवसांपूर्वी आमच्याशी वाद का घातला, असे म्हणुन शिवीगाळ करु लागले. तेव्हा संकेत पठारे त्यांना म्हणाला की, तुम्ही शिवीगाळ का करता. असे म्हणाला असता त्यावेळी मला संकेत अरुण काचोळे हा मला म्हणाला की, तु तुझ्या वर्गातील मुलां सोबत माझे भांडण झाले. तेव्हा तु माझे सोबत त्या मुलांना का मारू लागला नाही.
असे म्हणुन शिविगाळ दमदाटी करून बाटली डोक्यात मारली. तसेच आरोपींनी संकेत पठारे याला दगड, फायटर व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत संकेत पठारे हा जखमी झाला. त्याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्या फिर्यादीवरून आरोपी १) संकेत अरुण काचोळे, रा. खडांबे बुद्रुक, २) पृथ्वीराज निवृत्ती नन्नवरे ३) वैभव अनिल कल्हापुरे ४) ओंकार देवकर ५) वैभव संजय हरिश्चंद्रे ६) अक्षय शिरपुर, सर्व रा. खंडाबे खु. ७) मंगेश मिसाळ (पुर्ण नाव माहिती नाही) रा. राहुरी, ८) गौरव हंडाळ (पत्ता माहित नाही) ९) ओमकार पेरणे (पुर्ण नाव माहिती नाही) रा. तांदुळवाडी, ता. राहुरी.
या नऊ जणांवर गून्हा रजि. नं. १३३५/२०२३ भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १४९ मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
