कांद्याची चोरी करणाऱ्या भामट्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
कांद्याची चोरी करायला आलेल्या एका भामट्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना राहुरी तालूक्यातील ताहराबाद येथे दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी घडलीय. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गून्हा दाखल करण्यात आलाय.
तुकाराम आनंदा माळवदे, वय ३१ वर्ष, रा. ताहराबाद, ता. राहुरी. यांची ताहराबाद शिवारात शेती गट नं. ८४ मध्ये शेड असुन शेतात कांदा काढण्याचे काम चालु असुन कांदा शेडच्या समोर पटांगणात टाकलेला आहे. दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी रात्री १०.३० वा. चे सुमा तुकाराम माळवदे हे राहुरी येथुन ताहराबादकडे जात असताना त्यांच्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी गेले.
तेव्हा त्यांना गाडीच्या उजेडात एक इसम पळताना दिसला. तो शेताच्या बांधाच्या आड लपलेला असलेला दिसला. तुकाराम माळवदे यांना संशय आल्याने त्याचा पाठलाग करुन त्यास उजेडात जावुन पाहिले असता तो अविनाश भिकन विधाते असल्याचे दिसला. त्यास इकडे शेतात येण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर तुकाराम माळवदे यांनी इतर काही लोकांना बोलावुन घेतले. त्यानंतर सर्वानी त्यास विश्वासात घेवुन त्यास शेतात येण्याचे कारण विचारले असता त्याने "मी कांद्याची चोरी करण्यासाठी आलो" असल्याचे सांगितले. त्यांनतर तुकाराम माळवदे यांनी राहुरी पोलीस स्टेशनला फोन करुन कळविले असता राहुरी पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक अहिरे व चालक मोराळे हे तेथे आले. तेव्हा सदर भामट्याला पोलीसांच्या ताब्यात देवुन फिर्याद देण्यात आली.
तुकाराम आनंदा माळवदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अविनाश भिकन विधाते, वय २६ वर्षे, रा. ताहराबाद, ता. राहुरी. याच्यावर गून्हा रजि. नं. १३३६/२०२३ भादंवि कलम ३७९, ५११ प्रमाणे चोरीचा गून्हा दाखल करण्यात आलाय.
