Type Here to Get Search Results !

नेवासा - भीक नको आम्हाला आमच्या घामाचे मोल द्या - कांगुणे

 नेवासा - भीक नको आम्हाला आमच्या घामाचे मोल द्या - कांगुणे




नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे गेल्या दोन दिवसापासून गावातील सामाजिक कार्यकर्ते वसंत कांगुणे यांनी शेतकऱ्यांवर जो अन्याय होतो या संदर्भात गावातील श्रीराम सभा मंडप या ठिकाणी अमरण उपोषण सुरु केले आहे. यात त्यांच्या प्रमुख मागण्या कांदा निर्यात बंदी उठवावी, दुधाला किमान 35रुपये लिटर भाव मिळावा तसेच मुख्य मागणी म्हणजे सन 2023/24 चा पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा कारण आम्हांला भीक नको पण आमच्या घामाचे मोल मात्र आम्हाला द्यावे जो पर्यंत जिल्हा पालक मंत्री आम्हाला पीक विमा मंजूर करत नाही तो पर्यंत उपोषणास बसणार व दुधाला पण 35₹भाव मिळावा अश्या मागण्या घेऊन कांगूणे उपोषणास बसले असून यांना पाठींबा म्हणून गावातील शेतकरी, दूध उत्पादक, जैनपूर, घोगरगाव येथील देखील शेतकरी यांनी बेलपिंपळगाव येथे येऊन या उपोषणास पाठींबा दिला असून जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर उपोषण सोडणार नाही या वेळी सरपंच कृष्णा शिंदे, मा चेअरमन संभाजी शिंदे,मा उप सरपंच बंडू चौगुले,बाबासाहेब रोटे, कैलास शिंदे, विजय शेरकर, रामजी शिंदे, दिलीप रोटे, संदीप कांगुणे,सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत शिरसाठ, आबासाहेब शिंदे, विलास सरोदे, नामदेव येवले, संभाजी आघाडे, दिगंबर औटी,आदी शेतकरी उपस्थित होते