दारु पिल्याचे घरी सांगीतले म्हणून लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
दारु पिल्याचे घरच्या लोकांना सांगीतले म्हणून तीघा जणांनी मिळुन अनिल चव्हाण याच्यासह त्याच्या कुटुंबातील इतर लोकांना शिवीगाळ करत लाथा बूक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी शहरातील दत्तनगर परिसरात दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली.
अनिल रावसाहेब चव्हाण, वय २४ वर्षे, रा. दत्तनगर, राहुरी. या तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ९.३० वा. सुमारास अनिल चव्हाण हा त्याच्या घरी असताना आरोपी आकाश मरकड हा तेथे आला. आणि अनिल यास म्हणाला की, मी दारु पिल्याचे तू माइया घरच्यांना का सांगितले.
असे म्हणुन तो मला शिवीगाळ करु लागला. तेव्हा अनिल चव्हाण त्यास समजावुन सांगत असतांना त्यास राग येवुन त्याने काही तरी टणक वस्तुने अनिल याला मारहाण करुन जखमी केले. त्यावेळी अनिल याची पत्नी, वडील, आई हे सोडवा सोडव करण्यासाठी आले.
तेव्हा आरोपींना त्यांना देखील शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर अनिल रावसाहेब चव्हाण याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्या फिर्यादीवरून आरोपी आकाश बाळु मरकड, सोन्या अशोक काळे, दोघे रा. दत्तनगर, राहुरी तसेच पंकज नारे, रा. राहुरी. या तिघांवर गून्हा रजि. नं. २०४/२०२४ भादंवि कलम ३२३, ३२४, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आला.
