नगर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी हा एक नंबरचा पक्ष होईल- पिंटूनाना साळवे.
अनेक युवा महिला कार्यकर्त्यांचा 'वंचित' मध्ये प्रवेश, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शनाखाली राहुरी येथील वंचित बहुजन आघाडीचे महिला व पुरुष कार्यकर्ते संघटन व पक्ष बळकटीसाठी जिवाचे रान करत आहेत. वंचित च्या महिला आघाडी युवा जिल्हाध्यक्षा छाया दुशिंग यांच्या नेतृत्वाखाली अहिल्याबाई होळकर भवन येथे वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये अनेक महिला कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट, जिल्हा संपर्क प्रमुख पिंटूनाना साळवे, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा बाचकर, जिल्हा महासचिव अनिल जाधव, वंचित नेते जालिंदर घिगे, जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, तालुकाध्यक्ष संतोष चोळके, तालुकाध्यक्ष अनिता जगधने, तालुका महासचिव संदीप कोकाटे, युवा शहराध्यक्ष महेश साळवे, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ कीर्तने, साईनाथ बर्डे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आहेत.
युवक तालुकाध्यक्ष रवींद्र वैरागर, युवक जिल्हा उपाध्यक्ष विजय सरोदे, अपंग सेलचे गोविंद खवळे, जिल्हा प्रवक्त्या यमुना भालेराव, तालुका उपाध्यक्ष संदीप साळवे, शहर अध्यक्ष महेश साळवे, शहर उपाध्यक्ष सुरज अमृत, युवा सचिव अनिकेत गायकवाड, सोशल मीडिया सनी खरात, संघटक अरर्षद शेख तसेच सदस्य पदी सुमन निकम, सुनिता भालेराव, विजया निकाळजे तर म्हैसगाव येथील मंगल शिंदे, हिराबाई शेलार, अनिता विधाटे, रेखा विधाटे, आशाबाई विधाटे, इंदू विधाटे, रोहिणी विधाटे, मंदा विधाटे, शोभा विधाटे, सुलोचना विधाटे, संगीता विधाटे, मंगल छत्रे, सुरेखा गायकवाड, शीला कदम, सविता विधाटे, सुलोचना बागुल, शैला विधाटे, आशा भोकरे, कांता मैड, उज्वला लाहुंडे, सुमन विधाटे, सविता विधाटे यांसह आदी महिला पदाधिकऱ्यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित महिला कार्यकर्त्यांचे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वंचित जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष होईल- पिंटूनाना साळवे.
नगर जिल्ह्यामध्ये सध्या वंचित बहुजन आघाडीमध्ये विविध कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होत आहे. आगामी निवडणुकांमध्ये वंचित पक्ष हा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल व नगर जिल्ह्यात वंचित पक्ष हा एक नंबरचा पक्ष होईल, असा विश्वास आहे. त्यामुळेच वंचित पक्षांमध्ये सध्या कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरू आहे, अशी प्रतिक्रिया पिंटूनाना साळवे यांनी दिली.
