Type Here to Get Search Results !

राहुरी - शासकीय योजना सर्व सामन्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सदैव प्रयत्नशील- देवेंद्र लांबे पा.

 शासकीय योजना सर्व सामन्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सदैव प्रयत्नशील- देवेंद्र लांबे पा.



मुख्यमंत्री वायोश्री योजने अंतर्गत ६५ वर्ष वय पूर्ण असणाऱ्या नागरिकांना मिळणार रु. ३०००   


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहे. महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे गाव तिथे विकास घर तिथे योजना या योजने अंतर्गत शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.


नुकतेच राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेत ६५ वर्ष वय असणाऱ्या व्यक्तींना रु. ३००० चा लाभ देवून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सहाय्य करण्यात येणार आहे. राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमाना प्रमाणे येणारे अपंगत्व,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी मदत केली जाणार आहे.


या योजनेसाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, स्वयं घोषणापत्र, २ फोटो लागणार आहेत. योजनेची रक्कम लाभार्थी यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी महेंद्र शेळके ९५१८७६००६२, योगेश आढाव ८४०८८७७२९६ यांच्याशी संपर्क साधण्याचे अवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालय राहुरी तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.


नगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यात शासकीय योजना सर्वसामन्य जनते पर्यंत पोहचविण्यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी लोकसभेचे जलदूत खा. सदाशिव लोखंडे, नगर दक्षिणचे खा. सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. आ. शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली  राहुरी तालुक्यातील शिवसैनिक, शिवदूत, महिला आघाडी काम करत आहे. शासकीय योजना सर्व सामन्य जनते पर्यंत पोहचविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत. असे शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पा. म्हणाले.