चंद्रकला सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली रिपाई महिला आघाडीची बैठक.
महिलांनी बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- विलास साळवे.
भालेराव, वाकचौरे, गायकवाड, कापसे, दिपकराव गायकवाड, सुरेंद्र थोरात आदीचे मार्गदर्शन होणार.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
केद्रींय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पक्ष हा तळागाळा पर्यंत व बहुजन समाज्यात जावून पोहचला. सध्या रिपाईच्या माध्यमातून महिलांना काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर जिल्ह्याची कार्यकारिणी कणखर व कार्यश्रम बनविण्याकरिता रविवार दि. १७ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजता राहुरी येथील जयश्री हॉटेल येथे महिला आघाडी बैठक रिपाई महिला प्रदेश आघाडीच्या अध्यक्षा तथा पिंपरी- चिंचवड येथील नगरसेविका श्रीमती चंद्रकला सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्याची माहिती रिपाई उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष हा संपुर्ण देशातील तळागाळा पर्यत पोहचविण्याचे काम केद्रींय मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. प्रत्येक समाज्यातील माणसांना पक्षात काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. गावोगावी हा रिपाईचा कार्यकर्ता निर्माण झाला. तर राष्ट्रीय अध्यक्षा सौ. सिमाताई आठवले यांच्या नेतृत्वाखाली महिलाचे मोठे संघटन करण्यात आले आहे.
पक्षात महिलांना ही काम करण्याची संधी मिळाल्याने मोठ्या प्रमाणात महिला पुढे येवू लागल्या आहेत. त्याच धरर्तीवर उत्तर नगर जिल्ह्यातून महिलांची मजबूत फळी निर्माण करण्यासाठी राहुरी येथील जयश्री हॉटेल (कारखाना फाटा) येथे गुरुवार दि. १७ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हास्तरीय महिला कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, उ. महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे, राज्य सचिव दिपकराव गायकवाड, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आदीचे मार्गदर्शन होणार आहे.
तरी होणाऱ्या महिला आघाडी बैठकीकरिता मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित रहावे. असे आवाहन राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या वतीने करण्यात आले.
