Type Here to Get Search Results !

राहुरी - वॉरंटमधील तीन आरोपीना राहुरी पोलीसांकडून अटक, दोन आरोपींची जेल रवानगी.

 वॉरंटमधील तीन आरोपीना राहुरी पोलीसांकडून अटक, दोन आरोपींची जेल रवानगी.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


अनेक वेळा समन्स बजावून देखील न्यायालयात हजर राहत नसल्याने न्यायालयाने काढलेल्या अजामिन पात्र वॉरंट मधील तालूक्यातील तीन आरोपींना राहुरी पोलिस पथकाने पकडून गजाआड केले. त्यापैकी दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 


गेल्या अनेक दिवसां पासून न्यायालयीन तारखांना गैरहजर राहत असल्याने राहुरी येथील न्यायालयाने काढलेल्या अजामिन पात्र वॉरंट मधील आरोपी संपत राजाराम डेंग्रे, वय ४७ वर्षे, रा. टाकळीमियाॅ, मोसिन रफिक सय्यद, वय २९ वर्षे, रा. बारगाव नांदूर, प्रवीण रावसाहेब आढाव, वय २९ वर्षे, रा. सडे, ता. राहुरी. या तिघांना राहुरी पोलिस पथकाने पकडून गजाआड केले. 


सदरची कारवाई पोलीस निरिक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस उप निरीक्षक देवेंद्र शिंदे, धर्मराज पाटील, चारुदत्त खोंडे, समाधान फडोळ, हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, विकास साळवे, पोलिस नाईक प्रविण आहिरे, प्रविण बागुल, प्रमोद ढाकणे, नदिम शेख, अंकुश भोसले, सतिष कुऱ्हाडे, सचिन ताजणे, अजिनाथ पाखरे, गणेश सानप, महिला पोलीस नाईक वृषाली कुसळकर आदि पोलिस पथकाने केली.


पकडलेल्या आरोपींना दि. १३ मार्च २०२४ रोजी राहुरी येथील न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी संपत राजाराम डेंग्रे यास ७ दिवस व प्रवीण रावसाहेब आढाव यास ४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्या दोघांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

 

सदर आरोपींना यांना न्यायालयाने यापूर्वी समन्स काढले होते. सदर समन्सची बजावणी पोलिसांनी केली होती. समन्स मध्ये सदर आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांचे  जामीनपात्र वारंट काढून त्याची बजावणी करण्यात आली. परंतु नमुद जामीनपात्र वॉरंटातही गैरहजर राहिल्याने न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढल्याने सदर आरोपींना अटक करण्यात आली.


न्यायालय कामकाजात हजर न राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट निघून अटकेची वेळ येणार नाही. न्यायालयामध्ये आपल्या चालू असलेल्या केसेस बाबत आपण समन्स, जामीनपात्र वॉरंटमध्ये न्यायालयात वेळोवेळी हजर राहावे. असे आवाहन राहुरी पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.