विवाहित तरुणीचा सासरच्या लोकांकडून शारीरीक व मानसीक छळ.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
मुलबाळ होत नाही, तसेच ॲग्रोचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून २५ हजार रुपए आणावेत. या मागणीसाठी सासरच्या लोकांकडून विवाहित तरुणीचा शारीरीक व मानसीक छळ करण्यात आला. या बाबत सासरच्या सहा जणांवर गून्हा दाखल करण्यात आला.
कोमल सतिष सोनवणे, वय २८ वर्षे, रा. नांदगांव, ता. अहमदनगर हल्ली रा. गुहा, ता. राहुरी. या तरुणीचा विवाह नांदगांव येथील सतिष आण्णासाहेब सोनवणे याच्याशी दि. १६ सप्टेंबर २०२१ रोजी झाला होता. त्यानंतर काही महिन्याने पती सतिष आण्णासाहेब सोनवणे व घरातील इतर लोक काहीना काही कारणावरुन कोमल सोनवणे हिला शिवीगाळ करुन मारहाण करीत असे.
तसेच मुलबाळ होत नाही, आणि ॲग्रो दुकान टाकण्यासाठी माहेरहून २५ हजार रुपए आणावेत. या मागणीसाठी कोमल सोनवणे हिला मारहाण करून उपाशी पोटी ठेऊन शारीरीक व मानसीक छळ करु लागले. त्यांच्या जाचास कंटाळून कोमल सतिष सोनवणे या विवाहित तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
त्या फिर्यादीवरून आरोपी पती- सतिष आण्णासाहेब सोनवणे, चुलत सासरा- साहेबराव सोनवणे, चुलत सासु- अलका साहेबराव सोनवणे, चुलत भाया- बाबासाहेब साहेबराव सोनवणे, चुलत जाव- रुक्मिनी बाबासाहेब सोनवणे, चुलत नणंद- मनिषा भाऊसाहेब काळे, रा. देहरे, ता. जि. अहमदनगर. या सहा जणांवर गून्हा रजि. नं. २७१/२०२४ भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे शारीरीक व मानसीक छळ केल्याचा गून्हा दाखल करण्यात आला.
