घराच्या खोलीचा कडीकोंडा तोडून भामट्यांनी मोटारसायकल व पितळी भांडे पळवीले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
घराच्या खोलीचा कडीकोंडा तोडून घरात लावलेली मोटारसायकल व पितळी भांडे अज्ञात चार भामट्यांनी चोरुन नेल्याची घटना राहुरी तालूक्यातील बारागांव नांदुर येथे दिनांक १० मार्च रोजी पहाटेच्या दरम्यान घडली.
कैलास भानुदास काजळकर, वय ५२ वर्षे, रा. बारागांव नांदुर, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. १० मार्च २०२४ रोजी रात्री जेवण झाल्यानंतर कैलास काजळकर यांनी त्यांची बजाज कंपनीची बॉक्सर गाडी क्र. एम एच ०१- क्यु ए- ५८७० ही मोटारसायकल घरातील खोलीत लावली होती.
दिनांक ११ मार्च २०२४ रोजी पहाटे ३ वाजे दरम्यान काहीतरी आवाज आल्याने काजळकर यांना जाग आली. त्यावेळी दोन इसम हाथात हत्यार घेऊन घरात घुसले. त्यावेळी काजळकर हे घाबरल्याने ते झोपेत असल्याचे नाटक करून तसेच पडून राहिले.
तेव्हा दोन इसम खोलीच्या बाहेर होते. तर आत घुसलेल्या दोघांनी सामानाची उचकापाचक केली. त्यानंतर त्या अनोळखी भामट्यांनी शेजारी असलेल्या खोलीच्या बंद दरवाजा उघडून आत प्रवेश केला. आणि तेथील मोटारसायकल पितळाची टिप व हंडा चोरुन नेला.
कैलास भानुदास काजळकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार भामट्यांवर गून्हा रजि. नं. २६६/२०२४ भादंवि कलम ३८०, ४५८ प्रमाणे घरफोडीचा गून्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
